एक्स्प्लोर

Nashik Rain : नाशिकमध्ये कधी रिमझिम, कधी हलक्या, तर कधी जोरदार सरींची बरसात! गंगापूर धरणातून विसर्ग

Nashik Rain : गंगापूर धरणाच्या (Gangapur Dam) पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसाने धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत असून 500 क्युसेकने विसर्ग (Water Discharged) करण्यात येत आहे.

Nashik Rain : गंगापूर धरणाच्या (Gangapur Dam) पाणलोट क्षेत्रात  सुरू असलेल्या पावसाने धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे.  पावसाचा जोर टिकून असल्याने आज दुपारी 3 वाजता 500 क्युसेक व उद्या सकाळी 6:00 वा 1000 क्युसेक गंगापूर धरणातून  विसर्ग गोदावरी नदीपात्रात सोडण्यात येईल. पावसाचा जोर सतत राहिल्यास टप्याटप्याने विसर्ग वाढण्यात येईल, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. 

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून नाशिकसह (Nashik) गंगापूर पाणलोट (Gangapur Dam) क्षेत्रात पावसाची रिपरिप शहरात सकाळपासून पावसाची रिपरिप सुरूच असून स्वातंत्र्यदिनाच्या (August15) झालेले सूर्यदर्शन आज दिवसभर झालेले नाही. तर पावसाची संततधार सुरूच असल्याने जिल्ह्यातिल धरणासाठयातही कमालीची वाढ होऊन धरणं नव्वदी पार गेली असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले आहे. 

गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहर व गंगापूर पाणलोट क्षेत्र असलेल्या त्र्यंबकेश्वर परिसरात मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नदी नाल्याना काही प्रमाणात पूर आला आहे. तर नाशिक शहरात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होत आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात आणि घाटांच्या परिसरात पावसाचा जोर अधिक आहे. नाशिकमध्ये सलग तिसऱ्या दिवशी दिवसभर कमी-अधिक प्रमाणात पावसाची हजेरी कायम आहे. कधी रिमझिम, कधी हलक्या सरी, तर कधी अचानक पडणाऱ्या जोरदार सरींमुळे शहरात वातावरणात गारवा आहे. 

तर जुलैच्या पहिल्या आठवड्यात पावसाने नाशिककरांची दाणादाण उडवली होती. मात्र सध्या होणार पाऊस जोरदार नसला तरी संततधार असल्याने नोकरवर्ग, चाकरमाने, नागरिक यांची कसरत पाहणारा आहे. तर दुसरीकडे मनपा प्रशासनाने मोठया मुश्किलीने बुजवलेले खड्डे पुन्हा एकदा डोके वर काढून बसले आहेत. ज्या ठिकाणी रस्त्याची कामे सुरू आहेत, ते रस्ते चिखलमय झालेले आहेत. शहरातील रस्ते पाणी साचल्याने खूपच खराब झाले आहेत. 

दरम्यान मागच्या आठवड्यातील विकेंड सुरु झाल्यापासून पावसाची रिपरिप सुरू आहे. नागरिकांसह कामावर जाणाऱ्यांना रेनकोट परिधान करूनच बाहेर पडावे लागत आहे. नाशिक शहरातील काल दिवसभरात पावसाची रिपरिप सुरू होती आणि अधूनमधून काही जोरदार सरी कोसळल्या. तर सकाळपासूनच जैसे थे परिस्थिती आहे. नाशिक शहरात पाऊस सुरूच असून जिल्ह्यातील इगतपुरी व त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer) पट्ट्यात पावसाची सत्ताधार सुरूच आहे. यामुळे धरण साठ्यात कमालीची वाढ झाली आहे. 

धरणातील विसर्ग 
दरम्यान नाशिकसह जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच असल्याने अनेक धरणांतुन अद्यापही विसर्ग सुरु आहे. आज सकाळी दहा वाजेच्या सुमारास दारणातून 5708, कडवा 1165, आळंदी 30, पालखेड 5088, वालदेवी 183, भोजापूर 190, मुकणे 929,नांदूरमध्यमेश्वर 15061 तर होळकर पुलाखालून  278 क्युसेकचा विसर्ग सुरू असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. 

गंगापूर धरणातून विसर्ग 
दरम्यान जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात  सुरू असलेल्या पावसाने धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे.  पावसाचा जोर टिकून असल्याने आज दुपारी 3 वाजता 500 क्युसेक व उद्या सकाळी 6:00 वा 1000 क्युसेक गंगापूर धरणातून  विसर्ग गोदावरी नदीपात्रात सोडण्यात येईल. पावसाचा जोर सतत राहिल्यास टप्याटप्याने विसर्ग वाढण्यात येईल.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दीAshish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढलाRohit Sharma Meet Family : विजयानंतर रोहित शर्मा आईवडीलांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा...Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तर

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget