Nashik Shivsena : राज्यातील सत्ता बदलानंतर शिवसेना (Shivsena) मैदानात उतरली असून विस्कटलेली घडी पुन्हा बसविण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. त्यामुळे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) हे पदाधिकाऱ्यांच्या बैठक घेत असून उद्धव ठाकरे  (Udhhav Thakaray) हे देखील शिवसैनिकांच्या संपर्कांत आहेत. याच पार्श्वभूमीवर सत्ता बदलात नाशिकमधील (Nashik) दोन आमदार फुटल्यानंतर शिवसेनेने गांभीर्याने घेतले असून अनेक संघटनात्मक बदल केले आहेत. 


शिवसेनेतून बाहेर पडत शिंदे गटाने सरकार स्थापन केले. शिवसेनेचे निष्ठावान असलेले एकनाथ शिंदे (CM EKnath Shinde) मुख्यमंत्री झाले. दरम्यान शिंदे गटात नाशिकचे दोन शिवसैनिक देखील आहेत. ते म्हणजे तत्कालीन मंत्री दादा भुसे आणि नांदगाव चे आमदार सुहास कांदे होय. यामुळे नाशिकमध्ये शिवसेनेला मोठे भगदाड पडले. हे भगदाड भरून काढण्यासाठी नाशिक ग्रामीणच्या शिवसेनेत मोठे बदल करण्यात आले आहेत. खासदार संजय राऊत यांचे निकटवर्ती मानल्या जाणाऱ्या जिल्हा संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांच्या अधिकारात कपात करून दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या संपर्कप्रमुख पदी जुने निष्ठावान कार्यकर्ते जयंत दिंडे यांची निवड करण्यात आली आहे. 


आमदार दादा भुसे यांनी सुहास कांद्याच्या मतदार संघासह अन्य काही तालुक्यांची जबाबदारी गणेश धात्रक यांच्याकडे जिल्हाप्रमुख म्हणून देण्यात आली आहे. राज्यातील आमदार फुटी नंतर शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. या फुटीत नाशिकचे दोन्ही आमदार एकनाथ शिंदे यांच्या गटात दाखल झाले. राज्याचे कृषिमंत्री असलेले मालेगाव बाह्यचे आमदार दादा भुसे आणि नांदगावचे आमदार सुहास कांदे यांनी धक्का दिला आहे. नाशिक जिल्ह्याचा ग्रामीण भाग ही शिवसेनेची ताकद मानली जात असताना दोन आमदाराने धक्का दिल्याने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अत्यंत गांभीर्याने ही बाब घेतली आहे. 


खासदार संजय राऊत यांनी गेल्याच आठवड्यात नाशिक मध्ये येऊन डॅमेज कंट्रोल केले आणि पक्ष एक संघ असल्याचा दावा केला. मात्र त्यानंतर पक्षातील संघटना मजबूत करण्यासाठी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी संघटनात्मक फेरबदलाचा धाडसी निर्णय घेतला आहे. नाशिक जिल्ह्याचे संपर्कप्रमुख पद भाऊसाहेब चौधरी यांच्याकडे होते. आता त्यांना नाशिक जिल्हा लोकसभा मतदारसंघापूरतेच मर्यादित ठेवले असून दिंडोरी लोकसभा मतदार या संघाच्या संपर्कप्रमुख पदी जयंत दिंडे या जुन्या निष्ठावान माजी जिल्हाप्रमुखाची निवड करण्यात आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्याकडे कोणतेही पद नव्हते. त्यांच्या रूपाने जुन्या पदाधिकाऱ्याला संधी दिली आहे. अशाच प्रकारे याच मतदारसंघातील माजी जिल्हाप्रमुख अल्ताफ खान यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 


युवासेनेच्या युवा अधिकारीपदी विक्रम रंधवे 
नाशिक जिल्ह्याच्या युवा अधिकारी पदी विक्रम रंधवे यांची नियुक्ती युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी केली आहे त्यांच्याकडे दिंडोरी लोकसभेत येणारे निफाड चांदवड देवळा येवला लासलगाव व नांदगाव या मतदारसंघाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे त्यांच्याकडे आधी काही तालुके होतेच मात्र आता आमदार कांद्याच्या निकटवर्ती फरान खान यांच्याकडील दोन तालुके देखील रणवे यांच्याकडे देण्यात आले आहेत. 


नाशिक, दिंडोरीचे नगरसेवक माझ्यासोबत 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी ठाण्यात (Thane) असताना नाशिक (Nashik) शहराच्या राजकारणात खळबळ उडवून देणारे वक्तव्य केले आहे. नाशिक आणि दिंडोरीचे (Dindori) नगरसेवक माझ्यासोबत असल्याचे विधान केले आहे. त्यामुळे नाशिक पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सत्तेत आल्यानंतर कामाचा सपाटा लावला आहे. सध्या राज्यात अनेक भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली असल्याने ते त्या त्या भागात पाहणी दौरे करीत आहेत. दरम्यान आज गुरू पौर्णिमेनिमित्त ते ठाण्यात होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.