Chitra Wagh : शिंदे भाजप सरकार (BJP) चांगलं काम करत असून अवघ्या शंभर सव्वाशे दिवसाचे आमचं हे सरकार आहे. इतके दिवस फेसबुकवर (Facebook) सरकार होतं. आता लोकांच्या फेसवर स्माईल आणणार सरकार असल्याने रोज अतिशय चांगले शासन निर्णय केले जातात. शंभर सव्वाशे दिवसांमध्ये दोनशेहून अधिक निर्णय सरकारने घेतलं असल्याचे भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी सांगत महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारवर हल्लाबोल केला. 


भाजपच्या महिला मोर्चाच्या अध्यक्ष चित्रा वाघ (Chitra Wagh) आज नाशिक (Nashik) दौऱ्यावर आल्या असून त्यांनी भाजपच्या शहर कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिंदे फडणवीस सरकारने घेतलेले निर्णय आणि मागील अडीच वर्षाचा काळात महाविकास आघाडी सरकारने काय केलं याचा सोक्षमोक्ष त्यांनी यावेळी केला.शिंदे फडणवीस सरकारचा लेखाजोखा मांडताना त्यांनी सरकारचे भरभरून कौतुक केले. शिंदे फडणवीस सरकारचा पहिला निर्णय म्हणजे महाविकास आघाडी सरकारने ज्या स्वातंत्र्य सैनिकांची पेन्शन बंद केली होती, ती चालू केली. अतिवृष्टी झाली तेव्हा महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा सरकारने एनडीआरएफ चे निकष बदलले. मागच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये एसटी कर्मचाऱ्यांना स्वतःच्या हक्काने अधिकाऱ्यांसाठी आंदोलन करावं लागलं. मात्र आता शिंदे फडणवीस सरकार आलं. आणि एसटीची वाताहत संपुष्ठात आल्याचे त्या म्हणाल्या. 


चित्रा वाघ पुढे म्हणाल्या कि, सरकारने अनेक निर्णय घेतले आहेत, हे निर्णय आम्ही लाभार्थ्यांपर्यंत पोहचवत आहोत. त्यासाठी महिला मेळावे, जिल्हा दौरे करत आहोत. त्या माध्यमातून शिंदे फडणवीस सरकारने घेतलेले निर्णय तळागाळातील लोकांपर्यत पोहचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. सरकारकडून येणाऱ्या दिवसात निश्चित चांगले काम होईल. या मोहिमेत राज्यभरातील महिला सहभागी होत आहे. आगामी निवडणुकांसाठी णम महिलांस संधी दिली जणार आहे. येणाऱ्या काळात अनेक पक्षातील महिला भाजपमध्ये सहभागी होणार असून हजारो लाखो महिला राज्यभरातील नवीन प्रवेश होणार आहेत. त्यामुळे भाजपाची महिला आघाडी राज्यात जोर धरू लागणार असून अन्याय अत्याचार करणाऱ्या नराधमांना कठोर शिक्षा दिली जाईल, असा इशारा त्यांनी यावेळी दिला. 


भाजपची भूमिका फडणवीसांनी मांडली
छत्रपती शिवरायांवर राज्यपालांनी वक्तव्य केल्यानंतर अनेक स्तरावरून त्यांच्यावर टीका होत आहे. यावर भाजपाकडून देवेंद्र फडणविस यांनी प्रतिक्रिया दिली असून चंद्र आणि सूर्य असेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज त्यांचं स्थान अढळ आहे. यावर फडणविस यांनी विस्तृतपणे मांडली असून हि भाजपसह देशवासीयांची प्रतिकिया असल्याचे वाघ म्हणाल्या. तर दुसरीकडे कर्नाटक मुद्द्यावर बावनकुळे यांनी स्पष्ट मत मांडले असून 'टाचणीभर सुद्धा जागा कर्नाटक सरकारला दिली जाणार नसल्याचे ते म्हणाले आहेत. त्याचबरोबर सुषमा अंधारे काहीही बोलतात, आमची मिमिक्री केली जाते. त्यावर टाळ्या मिळवतात, शिट्ट्या मिळवतात, येऊ चांगलं आहे. महाविकास आघाडी सरकारने काय केलं हे बोला, आमच्यावर बोलून प्रसिद्धी मिळवत असल्याचे वाघ म्हणाल्या. .