Nashik Chhagan Bhujbal : राज्यसभेच्या निवडणुकीनंतर आता विधान परिषदेची परिषदेची निवडणूक होत आहे त्यासाठी 20 तारखेला मतदान होणार आहे परंतु मतदान आधी भाजप आणि महाविकास आघाडी मध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. राज्यात पुन्हा विधानपरिषद निवडणुकीच्या तोंडावर केंद्रीय यंत्रणांचा वापर होत असल्याचा आरोप अन्न पुरवठा नागरी मंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे. 


दरम्यान काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या विधान परिषद निवडणुकांसाठी महाविकास आघाडी तसेच भाजपच्या गोटात जोरदार हालचाली सुरु आहेत. मात्र दुसरीकडे एकमेकांच्या विरोधात फैरीही झाडल्या जात आहेत. अशातच काँग्रेसचे नेते नाना पाटोले यांनी गंभीर आरोप केला. ते म्हणाले, 'विधान परिषद निवडणुकीसाठी केंद्रीय तपास यंत्रणांकडून आमदारांना धमकीचे फोन येत आहेत', असा गंभीर आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. यानंतर अनेक महाविकास आघाडीच्याम मंत्र्यांनी याबाबत आपल्या प्रतिक्रिया दिल्या. 


या संदर्भात बोलताना पालकमंत्री भुजबळ म्हणाले कि, 'नाना पटोले यांच्या आरोपांना दुजोरा देतं, 'भाजप फोडाफोडीचे प्रयत्न करणारच. त्यामुळे विधान परिषद निवडणुकीसाठी केंद्रीय तपास यंत्रणांकडून राज्यातील​ आमदारांवर दबाव टाकण्याचे काम सुरू आहे, असा आरोप भुजबळांनी देखील केला आहे. तर राज्यसभेच्या निवडणुकीवेळी ही केंद्रीय यंत्रणांचा वापर होत असल्याचा आरोप मंत्र्यांनी तसेच आघाडीतील नेत्यांनी केला आहे. विधान परिषद निवडणुकीत भाजप कडून केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग केला जात आहे. मतदानासाठी केंद्रीय तपास यंत्रणा महा विकास आघाडीतील आमदारांवर दबाव टाकण्यासाठी फोन करत आहे असा आरोप भुजबळ यांनी केला आहे. 


ते पुढे म्हणाले 'भाजप हे केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून आमदारांवर मतदानासाठी दबाव आणत आहे. योग्य वेळ आल्यावर जनतेसमोर सर्व गोष्टी मांडू असेही ते यावेळी म्हणाले. तसेच आमच्या तिन्ही पक्षाचे उमेदवार निवडून येतील आणि त्याच बरोबर भाजपपेक्षा महा विकास आघाडीचे आमदार जास्त आहेत. अनिल देशमुख आणि मलिक यांचे मत मिळाले नाही तरी काही परिणाम दिसणार नाही. शिवाय भाजपचे चार सहज निवडून येतील पण त्यांनी पाच उमेदवार दिले आहेत. त्यामुळे ते प्रयत्न करणारच. मात्र भाजप केंद्र यंत्रणांचा दबाव टाकण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले. 


ओबीसी आरक्षणावर.... 
दरम्यान गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला ओबीसी आरक्षणाचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. ओबीसी नेते भुजबळ हे गेल्या काही दिवसांपासून ओबीसी आरक्षणासाठी लढा देत आहेत. यावेळी ते म्हणाले, की राज्यात 54 टक्के ओबीसी आहेत, मात्र आडनावावरून देता गोळा करता येणार नाही. अनेक जातींमध्ये एकसारखे आडनाव आहेत. आडनावावरून डेटा गोळा केल्यास ओबीसी समाजाचे नुकसान होईल. त्यामुळे या संदर्भात झालेल्या बैठकीत आम्ही हेच सांगितले आहे. त्यामुळे ओबीसी आरक्षण मिळालेच पाहिजे. त्यासाठी कोणालाही भेट भेटायची गरज लागल्यास त्याठिकाणी मी जाईन असा शब्दही यावेळी भुजबळ यांनी दिला.