Aditya Thackeray : दादा भुसेंच्या होम ग्राउंडवर आदित्य ठाकरे काय फटकेबाजी करणार? मालेगावी शिवसंवाद दौरा!
Aditya Thackeray : आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) मंत्री दादा भुसे (Minister Dada Bhuse) यांच्या मतदारसंघात पाऊल ठेवणार असून आज सायंकाळी मालेगाव (Malegaon) दौरा करणार आहेत.
Aditya Thackeray : मागील महिन्यात आदित्य ठाकरेंनी (Aditya Thackeray) नाशिकचा (Nashik) झंझावाती दौरा चांगलाच गाजला होता. यावेळी नाशिक बंडखोरी करून शिंदे गटात गेलेल्या दोन आमदारांवर आदित्य ठाकरेंनी ताशेरे ओढले होते. आता पुन्हा आदित्य ठाकरे मंत्री दादा भुसे (Minister Dada Bhuse) यांच्या मतदारसंघात पाऊल ठेवणार असून आज सायंकाळी ते मालेगावात (Malegaon) दौरा करणार आहेत.
शिवसेनेतून (Shivsena) शिंदे गट बाहेर पडल्यानंतर उद्धव ठाकरे (Udhhav Thackeray), आदित्य ठाकरे पुनर्बांधणीसाठी शिवसंवाद दौरा सुरु आहे. गेल्या दीड महिन्यांपासून हा दौरा सुरु असून काही दिवसांपूर्वीच आदित्य नाशिकच्या दौऱ्यावर आले होते. त्यांनतर आज पुन्हा जळगाव (Jalgoan) दौऱ्याच्या निमित्ताने ते मालेगावात देखील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. त्यामुळे येथील पूर्वाश्रमीचे शिवसेनेचे कट्टर समर्थक दादा भुसे यांच्या मतदारसंघात आदित्य ठाकरेंची तोफ धडाडणार आहे.
शिवसेनेत फूट पडल्यानंतर पक्ष अस्थिर होत असताना आदित्य ठाकरे हे मैदानात उतरले असून ते मालेगावी येत आहे. आदित्य ठाकरे सकाळी जळगाव जिल्ह्यातील काही मतदारसंघात पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतील त्यांनतर ते सायंकाळी आजच्या संवाद यात्रेची सांगता मालेगाव करणार आहेत. तर दोन आठवड्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व माजी मंत्री दादा भुसे यांनी मालेगाव दाैऱ्यात उद्धव ठाकरेंना लक्ष्य केले हाेते. या आराेपांना आदित्य ठाकरेंकडून प्रत्युत्तर अपेक्षित असल्याने त्यांच्या मालेगाव दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी शिवसेनेसोबत केलेल्या बंडखोरीमुळे पक्षाच्या पुनर्बांधणीसाठी आदित्य ठाकरे आज जळगाव दौऱ्यावर आहेत. यामध्ये पाचोरा, धरणगाव, पारोळा, मालेगावमध्ये ते शिवसैनिकाशी संवाद साधणार आहेत. विशेष शिवसंवाद दौऱ्यातील पहिल्या टप्प्यात त्यांना चांगला प्रतिसादही मिळाला. सपहिल्या टप्प्यात त्यांनी नाशिकमध्ये येत कार्यकर्त्यांची मने जिंकली होती. आणि बंडखोरांवर चांगलाच प्रहार केला होता. शिवसंवाद च्या निमित्ताने ते राज्यभरात दौरे करून शिवसैनिकांशी जवळीक साधत आहेत. आज ते मालेगाव दौऱ्यावर येणार आहेत.
दरम्यान मालेगाव हा दादा भुसे यांचा मतदारसंघ असल्याने चांगलीच खडाजंगी पाहायला मिळणार आहे. त्यामुळे त्यांच्या दौऱ्याला महत्त्व प्राप्त झाले आहे. शिवसंवाद च्या निमित्ताने कार्यकर्त्यांशी संवाद साधताना ते काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दादा भुसे कट्टर शिवसैनिक असताना त्यांनी शिंदे गटात सामील होऊन पक्षाशी गद्दारी केल्याचे मागील शिवसंवाद यात्रेत आदित्य म्हणाले होते. त्यामुळे आजच्या मालेगाव दौऱ्यात ते काय बोलतात याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.
आदित्य ठाकरेंचे बॅनर फाडले
आदित्य ठाकरे आज जळगाव दौऱ्यावर असून पाचोरा, धरणगाव, पारोळा, मालेगावमध्ये ते शिवसैनिकाशी संवाद साधणार आहेत. दरम्यान आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याआधी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. आदित्य ठाकरे यांचा आज धरणगावात ज्या मार्गाने प्रवेश होणार आहे. त्याच मार्गावरील बॅनर फाडल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली आहे. यामुळे काही काळ मोठा तणाव निर्माण झाला होता. आदित्य ठाकरे यांचा शिव संवाद यात्रा दौरा धरणगाव शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकजवळ आयोजित केला आहे.