Nashik Accident :नाशिक (Nashik) जिल्ह्यात अपघाताच्या (Accident) सातत्याने समोर येत आहेत. अनेकदा अपघात होऊनही वाहतूक नियमांचे (Traffic Rules) पालन न केल्याने अपघात वाढत आहेत. नाशिक परिसरात आज वेगवेगळ्या अपघातात दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू (Death) झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.  


नाशिक शहर परिसर आणि दिंडोरी (Dindori) परिसरात दोन वेगवेगळ्या अपघातात दोन दुचाकीस्वारांचा बळी गेला आहे. पहिली घटना दिंडोरी-वणी रस्त्यावर घडली आहे. वलखेड फाटा येथील वळणावर वलखेड रोडला अवनखेड हद्दीत अपघातात एक जण जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे.


दिंडोरी वणी रस्त्यावर कपालेश्वर फार्मा कंपनीचा कामगार संजय एकनाथ निकम हा उभा असताना पाठीमागून येणाऱ्या भरधाव ट्रकने त्यास चिरडले. त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला तर गर्दीचा फायदा घेत ट्रक चालक पळून गेला. यावेळी रस्त्यावरून जाणाऱ्या सुज्ञ नागरिकांनी तात्काळ रुग्णवाहिकेला संपर्क साधता घटनेची माहिती दिली. काही वेळात रुग्णवाहिका दाखल झाल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. दरम्यान घटनास्थळी पी.आय. प्रमोद वाघ यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हवालदार तुळशीराम जाधव, पोलीस नाईक प्रसाद सहाने दाखल झाले होते. याबाबत पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.


तर दुसरी घटना नाशिक-पुणे महामार्गावरील बिटको कॉलेज येथील गुरुद्वाराजवळ रस्ता ओलांडत असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव ट्रकने एकास उडवल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. राजेश दयाभाई पटेल आई मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पटेल हे बिटको कॉलेज येथील गुरुद्वाराजवळून रस्ता ओलांडत होते. यावेळी विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव ट्रकने त्यांना जोरदार धडक दिली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. यानंतर घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहे.


नाशिक ग्रामीणचे अपघात कधी थांबणार? 
एकीकडे नाशिक ग्रामीणचे रस्त्यांची चाळण झाली असून अशातच अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. नाशिकच्या गंगापूर गिरणारे रोड हा अपघातांना आमंत्रण देणारा ठरत आहे. या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी पोलीस अधीक्षक सचिन पाटील या नाशिक ग्रामीणच्या रस्त्यांवरील ब्लॅक स्पॉट ची पाहणी करणार असल्याचे सांगितले होते. तसेच राष्ट्रीय रस्ते प्राधिकरण चर्चा करून अपघातांना आळा बसविण्यासाठी उपाययोजना अंमलात आणल्या जाणार होत्या. मात्र फक्त ब्लॅक स्पॉटची पाहणी कागदावरच राहते की काय? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो आहे.


इतर संबधित बातम्या : 


Navratri 2022 : सप्तशृंगी देवीचे माहात्म्य, पूजा विधी, आख्यायिका आणि ऐतिहासिक महत्व 


Nashik Pune Railway : नाशिक-पुणे हाय स्पीड रेल्वेला मिळणार बूस्ट, मुख्यमंत्र्यांनी घेतलं मनावर