Nashik Pune High Speed : पुणे- नाशिक (Nashik-Pune) अति जलद हाय स्पीड रेल्वे (Highspeed Railway) मार्ग सह महारेलच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या राज्यातील रेल्वे प्रकल्पांना गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दिले. दरम्यान पुणे नाशिक अति जलद रेल्वे मार्ग प्रकल्पाचा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये (Central Goverment) मंजूर करण्याची विनंती मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत प्रकल्पाला मंजुरी मिळाल्यानंतर तातडीने काम सुरू करण्याचे सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. 


पुणे - नाशिक असा थेट रेल्वे मार्ग नसल्याने पुणे किंवा नाशिक (Nashik) गाठण्यासाठी मुंबईला (Mumbai) येऊन रेल्वे पकडावी लागते. त्यामुळे प्रवासासाठी सहा तास किंवा त्यापेक्षा जास्त वेळ लागतो. प्रवास वेळ कमी करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने सेमी हायस्पीड संकल्पना अंमलात आणण्याचा निर्णय घेतला आहे. ही मार्गिका पुणे, नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यांतून जाणार आहे. दरम्यान या पुणे नाशिक अति जलद रेल्वे मार्गाचे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सादरीकरण करण्यात आले. 


मुख्यमंत्र्यांनी बैठक सुरू असतानाच केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी दूरध्वनी वरून संपर्क साधत प्रकल्पांची माहिती दिली. पुणे नाशिक अति जलद रेल्वे मार्ग प्रकल्पांचा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळात बैठकीत मान्यता मान्यतेसाठी ठेवण्याच्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या विनंती वर कार्यवाही करण्यात येईल असे रेल्वेमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले. 


नाशिक पुणे रेल्वे हाय स्पीड 235 किमी चा एकूण मार्ग पुणे अहमदनगर नाशिक जिल्हा होणार आहे. देशातील सर्वात किफायतेशीर अति जलद मार्ग जवळपास 16 हजार कोटी रुपयांचा खर्चाचा प्रकल्प असून यात राज्याचा 3273 कोटींचा हिस्सा आहे. दरम्यान या प्रकल्पास तत्त्वत मान्यता देण्यात आली आहे. नाशिक पुणे रेल्वे प्रकल्प हा दोन जिल्ह्यातून जात असल्याने या मार्गावरील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी या प्रकल्पत आहेत. शिवाय ही मार्गिका पुणे, नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यांतून जाणार आहे. त्यासाठी 102 गावांमधील एक हजार 450 हेक्टर जमीन संपादित करण्यात येत आहे. पुणे - नाशिक असा थेट रेल्वे मार्ग नसल्याने पुणे किंवा नाशिक गाठण्यासाठी मुंबईला येऊन रेल्वे पकडावी लागते. त्यामुळे प्रवासासाठी सहा तास किंवा त्यापेक्षा जास्त वेळ लागतो. प्रवास वेळ कमी करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने सेमी हायस्पीड संकल्पना अंमलात आणण्याचा निर्णय घेतला आहे. 


अनेक गावात भूसंपादन
जिल्ह्यातील नाशिक आणि सिन्नर अशा दोन तालुक्यांतील देवळाली, विहितगाव, बेलतगव्हाण, संसरी, नाणेगाव, (नाशिक), वडगाव पिंगळा, चिचोली, मोह, वडझिरे, देशवंडी, पाटप्रिपी, बारागाव पिंप्री, कसबे सिन्नर, कुंदेवाडी मजरे, मुसळगाव, गोंदे, दातली, शिवाजीनगर, दोडी खुर्द आणि बुद्रुक, नांदूरशिंगोटे, चास नळवंडी (सिन्नर) अशा 23 गावांतून हा रेल्वेमार्ग जाणार आहे.