Nashik Godavari flood : नाशिकचा (Nashik) पूर ओसरला असला तरी मागील आठवडाभर सुरु असलेल्या पावसात गोदावरीच्या पुरातून अनेकांना बाहेर काढण्यात आपत्ती विभागाला यश आले आहे. यामध्ये आपत्ती वभागातील ८५४ स्वयंसेवकांनी हि सेवा बजावली असून यासाठी महानिदेशक रश्मी करंदीकर या दोन ते तीन दिवस नाशिकमध्ये ठाण मांडून होत्या. 


सध्या पावसाने उसंत घेतली असली तरी गेल्या एक आठवड्या पासून राज्यभरात पावसाने धुमाकूळ घातला. या पावसाने गोदावरी नदीला महापुर आला. नाशिकमध्ये धुवाधार पावसाने प्रशासनाची तारांबळ उडाली. त्याचप्रमाणे जोरदार पावसामुळे गोदावरी नदीला पूर आल्याने काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. त्यांनतर गोदावरी नदीकाठच्या गावात आपत्ती व्यवस्थापन विभाग सक्रिय झाला आहे. या प्रक्रियेमध्ये नागरी संरक्षण संचालनालय, महानीदेशक रश्मी करंदीकर नाशिकमध्ये दाखल झाल्या होत्या. करंदीकर यांनी नागरी स्वरक्षण दलाच्या सर्व कर्मचारी व अधिकारी तसेच प्रशिक्षणार्थीना कर्तव्यावर हजर करण्यात आले आहे . 


नाशिक शहरात उपनियंत्रक नागरी स्वरक्षण यांच्याकडून आठ विभाग करण्यात आले असून या विभागांमधून 854 स्वयंसेवकाना प्रशिक्षण देण्यात आले आहे. पूर परिस्थिती निर्माण झाल्यास हे स्वयंसेवक आपत्ती व्यवस्थापनाच्या मदतीला आपले कार्य करतील. नागरी संरक्षण संचालनालय, महानीदेशक रश्मी करंदीकर यांनी नाशिक जिल्हातील पूर परिस्थितीची पाहणी करून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी तथा निवासी उप जिल्हाधिकारी, नाशिक यांचे   समवेत स्वयंसेवक कर्तव्य बाबत चर्चा केली. तसेच नागरी संरक्षण कार्यालय नाशिक येथे प्रत्यक्ष भेट देवून उपस्थित स्वयंसेवक यांना मार्गदर्शन करून कार्यालयीन कामकाजाचा आढावा घेतला. सदर उपक्रमास एकुण 45 स्वयंसेवक/  स्वयंसेविका तसेच 12 कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते.


गोदावरीचा पूर ओसरला 
सध्या नाशिक शहरसह जिल्ह्यात पावसाने उसंत घेतली असून जिल्ह्यातील धरणांतून विसर्गही घटविण्यात आला आहे. त्यामुळे गोदावरी नदीचा पूरही ओसरला आहे. त्यामुळे सध्या तरी नदीकाठच्या गावांना पूर परिस्थिती नसल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले आहे. मात्र आपत्ती व्यवस्थापन आजही सतर्क असून स्वयंसेवक देखील सेवा बजावत आहेत.