Nashik Hemant Godse : शिवसेनेच्या (Shivsena) 40 आमदारांपाठोपाठ आता पक्षाचे बाराहून अधिक खासदार शिंदे (Shinde Gat) गटात सामील झाले आहेत. या गटात आता नाशिकचे खासदार हेमंत गोडसे (MP hemant Godse) यांचा देखील समावेश झाल्याची प्राथमिक माहिती समजते आहे. दरम्यान या पार्श्वभूमीवर आज सकाळपासूनच गोडसे यांच्या नाशिकच्या कार्यालयाबाहेर मोठा बंदोबस्त वाढविण्यात आला असून खासदार हेमंत गोडसे यांना वाय दर्जाची सुरक्षा बहाल करण्यात आल्याचे समजते. 


गेल्या महिन्याभरात राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या पाठीमागे शिवसेनेचे सर्वच आमदार गेल्याचे समोर आले. त्यांनतर शिवसेना विरुद्ध शिंदेसेने असा संघर्ष उभा राहिला आहे. अशातच आता शिवसेनेचे खासदारही पक्षातून काढता पाय घेत असल्याने शिवससेनेला आणखी एक धक्का या माध्यमातून बसला आहे. यामध्ये नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांचा समावेश आहे. सोमवारी शिंदे गटाच्या कार्यकारिणी गोडसे यांनी ऑनलाईन हजेरी लावली होती. त्यांनतर आज सकाळपासून गोडसे यांच्या कार्यालयासमोर पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. 


शिवसेनेच्या 40 आमदारांनी बंद केल्यानंतर पक्षाच्या संसदीय मंडळातही फूट अटळ मानली जात आहे. शिवसेनेचे 12 ते 14 खासदार शिंदे गटात सामील झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या सर्वानी गेल्या पंधरवड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत दिल्ली येथे झालेल्या बैठकीला हजेरी लावली होती.  त्यानंतर खासदारांचा हा गट उघडपणे शिंदे गटाचे समर्थन करताना दिसत आहे. याबाबत खासदार हेमंत गोडसे यांनी देखील आपण शिंदे गटात सामील होत असल्याच्या बातमीला दुजोरा दिला. भाजपसोबत जाण्यातच शिवसेनेचे चांगले असे त्यांनी मत मांडले. 


दरम्यान शिंदे गटात सामील होण्याच्या पार्श्वभूमीवर हेमंत गोडसे म्हणाले कि,  भाजपसोबत युती राहावी अशी सर्व खासदारांची भूमिका आहे. शिवसेना भाजप युतीमुळे शिवसेनेचे भले आहे. दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत खासदार ऑनलाईन हजर होतो. बुलढाणा येथील खासदार प्रताप जाधव यांनी सांगितले कि सर्व खासदारानी शिंदे गटात जाणे योग्य राहील, असे गोडसे म्हणाले. 



घर आणि कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त 
नाशिकचे शिवसेना खासदार हेमंत गोडसे यांच्या जनसंपर्क कार्यालयाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. काल रात्रीपासूनच सुरक्षा पुरवण्यात आली आहे. हेमंत गोडसे यांचे घर आणि निवासस्थानाबाहेर 24 तास शस्त्रधारी पोलीस तैनात आहेत. यामध्ये नाशिकचे स्थानिक पोलीस, दंगल नियंत्रण पथकाच्या जवानांचा बंदोबस्त आहे. खासदार हेमंत गोडसे शिंदे गटात सहभागी झाल्याच्या चर्चांमुळे सुरक्षा पुरवण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. हेमंत गोडसे यांच्या कार्यालयापासून शिवसेना मध्यवर्ती कार्यालय जवळच आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आमदारांपाठोपाठ खासदारांचाही गट स्थापन करण्यात आला आहे.