Nashik News : लोणावळ्याला (Lonawala) वाढदिवस (Birthday) साजरा करण्यासाठी गेलेल्या नाशिकच्या (Nashik) पवार कुटुंबियांवर दुःखांचा डोंगर कोसळला आहे. हॉटेलच्या स्विमिंग टॅंकमध्ये (Swimming Tank) बुडून दोन वर्षाच्या मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. 


नाशिकला राहणारे पवार कुटुंबीय हे मुलाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी लोणावळ्याला गेले होते. लोणावळ्यातील एका व्हिलामध्ये वाढदिवस करण्याचा बेत पवार कुटुंबीयांनी आखला होता. त्यानुसार ते लोणावळ्याला पोहचले. यावेळी वडील चेक इनच्या फॉर्मलिटीज पूर्ण करत असताना मुलगा स्विमिंग टँकच्या दिशेने गेला आणि खेळण्याकडे आकर्षित होवून पाण्यात पडला. यात शिवबा अखिल पवार या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही (CCTV) मध्ये कैद झाला आहे. या घटनेने लोणावळासह पवार कुटुंबीय राहणाऱ्या परिसरात खळबळ उडाली आहे. 


नाशिकचे पवार कुटुंबीय हे आपल्या जुळ्या मुलांचा दुसरा वाढदिवस साजरा करण्यासाठी पवार कुटुंबियांसह दहा ते बारा जण लोणावळ्याला गेले होते. यावेळी सर्वजण बुक केलेल्या व्हिलावर पोहचले. सर्वांनी चेक करण्याच्या प्रक्रिया करण्यासाठी एका ठिकाणी थांबले. शिवबाचे वडील देखील चेक इन करत होते. येवले रिसेप्शनच्या जवळच स्विमिंग टॅंक होता. खेळण्याच्या बहाण्याने शिवबा हा टॅंककडे गेला. व तो पाण्यात पडला. यावेळी शिवबाच्या कुटुंबियांना ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी स्विमिंग टॅंककडे धाव घेतली. त्याला बुडताना पाहून त्याच्या कुटुंबीयांनी पुलाकडे धाव घेत शिवबास बाहेर काढले. तसेच, त्याच्या पोटातील पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न करत त्याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले.


जुळ्या मुलांचा वाढदिवस 
पवार कुटुंबीय हे आपल्या जुळ्या मुलांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी नातेवाईकांसोबत लोणावळ्याला गेले होते. मात्र लोणावळ्यातील एका विलामध्ये चेक इन करत असताना हि घटना घडली. विशेष म्हणजे वाढदिवसाच्या आदल्या दिवशीच अशी घटना घडल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. वडील चेक इन च्या फॉर्मलिटीज पूर्ण करत असताना मुलगा स्विमिंग टँकच्या दिशेने गेला आणि खेळण्याकडे आकर्षित होवून पाण्यात पडला. हा सम्पूर्ण प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे. 


आनंदावर विरजन
नाशिकचे पवार कुटुंबीय जुळ्या मुलांचा वाढदिवस साजरा होणार या अपेक्षेने आनंदित होते. एकीकडे वाढदिवस म्हणजे प्रत्येकासाठी एक खास दिवस असतो. कुटुंबीय, मित्र आणि आप्तेष्ट यांच्या प्रेमळ शुभेच्छांचा वर्षाव झेलण्याचा दिवस म्हणजे वाढदिवस. मात्र या आनंदाच्या दिवशीच पवार कुटुंबियांच्या एका मुलावर काळाने घाला घातल्याने त्यांच्यावर दुःखांचा डोंगर कोसळला आहे.