Nashik 12th Exam : बारावी परीक्षा (12th Exam) सुरू झाल्या असून राज्यात सुरू असलेल्या कॉफी मुक्त अभियानाला नाशिकमध्ये (NashiK) चांगला प्रतिसाद मिळाला. नाशिक शहरासह जिल्हाभरात एकही कॉपी केस प्रकार (Copy Case) आढळून आला नाही, मात्र 1000 हून अधिक विद्यार्थ्यांनी पहिल्या पेपरला दांडी मारल्याचे निदर्शनास आले. 


माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या इतर बारावीच्या परीक्षांना (HSC Exam) कालपासून प्रारंभ झाला. यंदा कॉपीमुक्त अभियान राबविण्यात येत असल्याने अत्यंत काटेकोर नियोजन करण्यात आले होते. याशिवाय विद्यार्थ्यांवरील ताण कमी व्हावा, यासाठी दोन पेपर्समध्ये अंतर ठेवण्यात आले होते. शिवाय समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. दरम्यान, यावर्षी नाशिकमध्ये एकही कॉपी केस झाली नाही. त्यामुळे राज्यातील कॉफी मुक्त अभियानाला नाशिकमधून चांगला प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले.


विभागातून जवळपास दीड लाखाहून अधिक विद्यार्थी प्रविष्ट झालेले असताना त्यापैकी केवळ एक लाख 58 हजार 732 इतक्या विद्यार्थ्यांनीच परीक्षा दिली. म्हणजेच, जवळपास 3000 होऊन अधिक विद्यार्थी हे इंग्रजीच्या पेपरला अनुपस्थित असल्याचे निदर्शनास आले. परीक्षा तणाव मुक्त आणि निर्भय वातावरणात होण्याबरोबरच विद्यार्थ्यांवरील ताण कमी करण्यासाठी बोर्डाकडून अनेक उपाययोजना करण्यात येऊनही इयत्ता बारावीच्या इंग्रजी विषयाच्या पेपर पेपरला तब्बल साडेतीन हजार विद्यार्थ्यांनी दांडी मारली. एकट्या नाशिक जिल्ह्यात 1 हजार 148 विद्यार्थी इंग्रजी पेपरला हजर नव्हते. 


धुळे शिरपूरला दोन बहाद्दर  


इंग्रजी विषयाच्या पेपरला नाशिक शहरासह जिल्ह्यात कुठेही कॉपी केस आढळून आली नाही. मात्र धुळे शिरपूरला दोन ठिकाणी कॉपीची प्रकरणे आढळून आली. ही दोन्ही प्रकरणे धुळ्यातील शिरपूर येथील आहेत. या दोन्ही विद्यार्थ्यांवर नियमानुसार कारवाई करण्यात आले असून त्यांना आपले म्हणणे मांडण्याची देखील संधी दिली जाणार आहे. तर दुसरीकडे नाशिक शहरात ज्या विषयाचा पेपर त्याच विषयाचे शिक्षक हे पर्यवेक्षण करत असल्याचे तीन ठिकाणी आढळून आले. त्यावर मंडळाने तीव्र दखल घेत संबंधित केंद्रांना नोटीसा देऊन एक स्वतंत्र परिपत्रक काढून आगामी परीक्षांवेळी खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या. 


परीक्षा बोर्डाचा पराक्रम


कालपासून राज्यात महाराष्ट्र बोर्डाची बारावीची परीक्षा सुरू झाली आहे. मात्र, पहिल्याच दिवशी बोर्डाचा भोंगळ कारभार दिसून आला आहे. इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत प्रश्नच छापून आला नाही. मात्र, त्याऐवजी थेट उत्तर छापण्यात आले आहे. त्यावरून विद्यार्थ्यांमध्ये मोठा गोंधळ उडाला होता. प्रश्नपत्रिकेतील या घोळामुळे विद्यार्थ्यांना सहा गुणांची लॉटरी लागणार का? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. तर, बोर्डाने या प्रकरणाची चौकशी करणार असल्याचे म्हटले आहे.