Shasan Apalya Dari : आज नाशिकमध्ये (Nashik) शासन आपल्या दारी हा कार्यक्रम पार पडत आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह (Eknath Shinde) देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे देखील उपस्थित राहणार आहेत. शिवाय मंत्रिमंडळातील तब्बल नऊ मंत्र्याची उपस्थिती या कार्यक्रमाला असणार आहे. त्यामुळे नाशिक शहरात आज मंत्र्याची मांदियाळी पाहायला मिळणार आहे. 


दरम्यान, मंत्रिमंडळाचे खातेवाटप (Maharashtra Cabinet Expansion) झाल्यानंतर पहिला शासन आपल्या दारी कार्यक्रम नाशिकमध्ये पार पडतो आहे. नाशिकच्या गंगापूर रोडवरील डोंगरे वस्तीगृह मैदानावर हा कार्यक्रम होत आहे. आज सकाळी साडेअकरा वाजता या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहेत. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार (Ajit pawar) यांच्यासह नऊ मंत्री उपस्थित असणार आहेत. कार्यक्रमासाठी उदय सामंत, गिरीश महाजन, दादा भुसे (Dada Bhuse), छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे देखील उपस्थित राहणार आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर पोलिसांकडून शहरात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच तीन पक्षाकडून जोरदार तयारी करण्यात आलेली आहे. कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी झेंडे लावण्यात आले आहेत, मोठ्या प्रमाणावर बॅनरबाजी करण्यात आली आहे. 


तेरा दिवसांचा तिढा सुटल्यानंतर मंत्री मंडळाचा विस्तार झाला आहे. या मंत्री मंडळ विस्तारामुळेच नाशिकचा शासन आपल्या दारी हा कार्यक्रम पुढे ढकलला जात होता. मात्र नुकताच मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असून नाशिकमध्ये शासन आपल्या दारीचा कार्यक्रम आज होत आहे. या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये नऊ मंत्री उपस्थित आहेत. यात एकनाथ शिंदेसह देवेंद्र फडणविस, अजित पवार उदय सामंत, गिरीश महाजन, दादा भुसे, छगन भुजबळ, राधाकृष्ण विखे पाटील, डॉ. भारती पवार हे नऊ मंत्री उपस्थित राहणार आहेत. थोड्याच वेळात या कार्यक्रमाला सुरवात होत असून आज नाशिकला मंत्र्याची मांदियाळी पाहायला मिळत आहे. 


दरम्यान या कार्यक्रमासाठी जिल्हाभरातून लाभार्थ्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. हजारोच्या संख्येने या कार्यक्रमाला लाभार्थ्यांची उपस्थिती असणार आहे. यासाठी 500 हून अधिक एसटी बस 100 सिटी बसेस, 100 सिटी बसेस आणि 2 हजारहुन अधिक वाहने शहरात दाखल होणार असल्याने संभाव्य वाहतूक कोंडी लक्षात घेता अनेक वाहतूक मार्गातही पोलिसांकडून बदल करण्यात आले आहेत. कार्यक्रमस्थळी बॅग पिशवी जेवणाचे साहित्य पाणी बॉटल तसेच प्लास्टिक किंवा काचेचे साहित्य नेण्यास पोलिसांकडून बंदी घालण्यात आलेली आहेत. नाशिक जिल्हा हा खरंतर शेतकऱ्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. त्याच पार्श्वभूमीवर इथे टोपल्यांमध्ये टोमॅटो, डाळिंब, द्राक्ष, कांदे आणि ढोबळी मिरची ठेवण्यात आलेली आहे. एकंदरीतच कुठेतरी शासन हे शेतकऱ्यांच्या पाठीशी आहेत हेच दाखवण्याचा प्रयत्न आहे अनेक शासनाच्या योजनांची या कार्यक्रमा तून पाहिली जाणार आहेत अकरा लाभार्थी आहेत आणि या संपूर्ण पार्श्वभूमीवरती प्रशासनाची देखील तयारीत आहेत ती पूर्ण झाली आहे 


उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं शक्ती प्रदर्शन 


दरम्यान अजित पवार हे नाशिकरोड रेल्वेस्थानकावर उतरल्यानंतर अनेक पदाधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर अजित पवार यांनी नाशिकरोड येथील डॉ. बाबासाहेब अमीबाडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. त्यांनतर पायी चालत जाऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. त्यानंतर आता ते शासकीय विश्रामगृहाकडे रवाना झाले आहेत. यादरम्यान मोठे शक्तिप्रदर्शन अजित पवार यांच्याकडून करण्याचे येत असल्याचे दिसत आहे. त्याचबरोबर या ठिकाणी आमदार सरोज अहिरे देखील अजित पवार यांच्यासोबत उपस्थित असल्याचे दिसून येत आहेत. त्यामुळे काही मिनिटांपूर्वी सरोज अहिरे यांनी अजित पवार यांना पाठिंबा जाहीर केल्यांनतर लागलीच त्यांचे स्वागत अहिरे यांनी केले आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Shasan Aaplya Dari Nasik: शासन आपल्या दारी कार्यक्रमाला कुणा कुणाची हजेरी?