Nashik Saroj Ahire : अखेर नाशिकच्या (Nashik) राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरे (Saroj Ahire) यांनी भूमिका जाहीर केली असून मतदारसंघातील विकासकामांसाठी सत्तेत जाणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 'शरद पवार हे वडिलांसारखे असून अजितदादा भावासारखे आहेत', मात्र या द्विधा मनस्थितीतून बाहेर पडत आमदार सरोज अहिरे आपलं निर्णय जाहीर केला आहे. मतदारसंघातील विकासासाठी अजित दादांसोबत असल्याचे स्पष्ट करत नाशिक (Nashik) जिल्ह्यातील सहाही आमदार आता अजित पवार गटाकडे असल्याचे स्पष्ट झाले आहे. 


नाशिकमधील शासन आपल्या दारी (Shasan Apalya Dari) या कार्यक्रमानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे नाशिक दौऱ्यावर येत आहेत. या पार्श्वभूमीवर आज सकाळपासूनच नाशिक रोड रेल्वे स्टेशनवर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून मोठी गर्दी केली आहे. याच स्वागतासाठी आमदार सरोज अहिरे या देखील उपस्थित आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून आपली भूमिका जाहीर करू न शकणाऱ्या सरोज अहिरे आज अजित पवार यांच्या स्वागताला आल्याने आश्चर्य व्यक्तब करण्यात आले. यावेळी एबीपी माझाने त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपली भूमिका जाहीर करत अजित दादांसोबत असल्याचे सांगितले. 


अजितदादांचं स्वागत करणं माझं कर्तव्य 


आमदार सरोज अहिरे यावेळी म्हणाल्या की, अजितदादा पहिल्यांदा नाशिक दौऱ्यावर येत आहेत. त्यामुळे एक आमदार म्हणून त्यांचं स्वागत करणं माझं कर्तव्य असल्याने त्यांच्या स्वार्थासाठी आज आली आहे. अजित पवार यांच्या स्वागतासाठी उपस्थित आहात म्हणजे आपण अजित दादासोबत असल्याचे समजले जात आहे. या प्रश्नावर त्या म्हणाल्या की, 'मतदार संघात बऱ्यापैकी चर्चा केली असून उद्यापर्यंत आपल्याला माझी भूमिका जाहीर करणार आहे. पवार कुटुंबापासून आम्ही काही वेगळे नाही. त्यामुळे दादांचं स्वागत करणं हे आमच्यासाठी आनंददायी आहे. शरद पवार (Sharad Pawar) हे वडिलांसारखे असून अजित दादांनी भावासारखे प्रेम दिला आहे. त्यामुळे द्विधा मनस्थितीतून बाहेर पडत निर्णय घेतला आहे. वडिलांची साथ द्यावी की भावाची साथ द्यावी, असा पेच निर्माण झाला होता, मात्र आता मतदारसंघातील लोकप्रतिनिधींशी चर्चा करून अजित दादांबरोबर जाण्याचा निर्णय घेतला आहे. 


विकास कामांसाठी सत्तेत राहणं महत्त्वाचं 


तसेच अजित दादांसोबत जाण्याचे कारण म्हणजे मतदार संघातील विकास खुंटला आहे. अनेक विकास काम थांबून आहेत आणि ही विकास काम सुरू होण्यासाठी थांबलेले विकास कामांना गती मिळण्यासाठी सत्तेत राहणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे अजित पवार यांना माझा पाठिंबा दिला आहे. दरम्यान सरोज अहिरे यांनी पहिल्यांदा आपली भूमिका एबीपी माझाला दिलेली आहे. त्या अजित पवार यांच्या सोबत राहणार आहेत. मतदारसंघातील विकास काम ही झाली पाहिजेत, हीच इथल्या मतदारांची मागणी आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. आतापर्यंत 95 टक्के नागरिकांशी, पदाधिकाऱ्यांशी त्यांनी संवाद साधलेला आहे. त्यामुळे आता आपण अजित दादांच्या स्वागतासाठी इथे आलेलो आहोत, आपण अजित पवार यांच्यासोबतच राहणार असं त्यांनी खुलासा केलेला आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे सहाच्या सहा आमदार अजित पवार यांच्याबरोबर आहेत. 


Saroj Ahire NCP: सही केली म्हणून माझा पाठिंबा गृहीत धरला, कुणासोबत जावं हे ठरलं नाही: आमदार सरोज अहिरे