Nashik Army Bharti : तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल तर भारतीय सेनेत अग्नीवीर होण्याची सुवर्ण संधी आहे. तरुणांसाठी भारतीय सेनेत (Indian Army) नोकरी करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. जर तुम्हाला सैन्यदलात सामील व्हायचं असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे. भारतीय सेनेकडून अनेक पदांसाठी भरती काढण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून रिक्त पदांसाठी (Army recruitment) उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले होते.  भारतीय सेनेत भूदल भरतीसाठी 2023-24 या वर्षापासून अग्नीवीर भरती पद्धतीत बदल करण्यात आला आहे. 


काही महिन्यांपासून अग्नीवीरांची (Agniveer) भारतीय सैन्यात भरती केली जात आहे. या अनुषंगाने सेनाभर्ती कार्यालय मुंबई यांच्यामार्फत भारतीय सेनेत भूदल भरतीसाठी 2023-24 या वर्षापासून अग्नीवीर भरती पद्धतीत बदल करण्यात आला आहे. त्यानुसार अग्निवीर तांत्रिक, लिपिक, जनरल ड्यूटी व ट्रेडसमन अशा विविध पदांची भरती करण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज सादर करावेत, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ओंकार कापले यांनी कळविले आहे.


त्यानुसार सेनाभरती कार्यालयाने भरतीबाबत ऑफिशियल नोटिफिकेशन जारी केलं आहे. यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. इच्छुक उमेदवारांनी https://www.joinindianarmy.nic.in/default.aspx या संकेतस्थळावर 15 मार्च 2023 पर्यंत रात्री 11.59 वाजेपावेतो ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे. लिपिक जनरल ड्यूटी पदासाठी 10 वी पास तर ट्रेडसमन पदासाठी 8 वी पास असणे आवश्यक आहे. या भरती अभियानाच्या माध्यमातून अनेक पदांना भरण्यात येईल. यात अग्निवीर तांत्रिक, लिपिक, जनरल ड्युटी व ट्रेडसमन या पदांसाठी मुंबई शहर, मुंबई उपनगर, नाशिक, रायगड, पालघर, ठाणे, धुळे व नंदूरबार या जिल्ह्यांच्या उमेदवारांची भरती करण्यात येणार आहे.


अग्निवीर भरती पद्धतीत बदल केल्यानुसार पहिल्या टप्प्यात संगणकाद्वारे ऑनलाईन पद्धतीने लेखी परीक्षा होणार असून दुसऱ्या टप्प्यात लेखी परीक्षा पास झालेल्या उमेदवारांची शारीरिक चाचणी घेण्यात येणार आहे. या भरतीसाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र युवकांनी दिलेल्या मुदतीत ऑनलाईन अर्ज सादर करावेत, असे आवाहनही कापले यांनी केले आहे.



असं करा अप्लाय


सर्वात आधी आर्मीची ऑफिशियल वेबसाईट joinindianarmy.nic.in वर क्लिक करा. त्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन करुन घ्या आणि अर्ज भरा. सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. त्यानंतर फॉर्म सबमिट करा आणि भविष्यासाठी प्रिंट आऊट काढून घ्या. तर अग्निवीर भरती पद्धतीत बदल केल्यानुसार पहिल्या टप्प्यात संगणकाद्वारे ऑनलाईन पद्धतीने लेखी परीक्षा घेतली जाईल. यानंतर भरती प्रक्रियेचा दुसरा टप्पा सुरू होईल. यामध्ये लेखी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची शारीरिक चाचणी घेण्यात येणार आहे. या भरतीसाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र युवकांनी दिलेल्या मुदतीत ऑनलाईन अर्ज सादर करावेत असे कापले यांनी यांनी सांगितले.