Nashik Politics : मागील चार वर्षात अनेकदा महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) भूकंप झाले. त्यातच कालचा सर्वात मोठा भूकंप राज्याच्या मतदारांनी अनुभवला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार (Ajit Pawar) यांनी तीस आमदारांसोबत शिंदे भाजप सरकारमध्ये सामील होत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. या सर्वात भुजबळांनी देखील कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर नाशिकच्या राजकारणात मोठी उलथापालथ पाहायला मिळाली आहे. मंत्री मंडळ विस्तारात नाशिक भाजपाला 9nashik BJP) मंत्रिपद मिळणार होते, मात्र झालं उलटंच. भाजपसोबत शिंदे गटातील सुहास कांदे यांचेही नाव मंत्री पदाच्या शर्यतीत होते, मात्र ते देखील आता अडचणीत सापडल्याचे चित्र आहे. 


राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप घडला. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये (Devendra Fadnavis) अजित पवारांची एंट्री झाली. अजित पवारांसोबत निम्या राष्ट्रवादीने एंट्री केल्याने एकच खळबळ उडाली. काही तासांत राष्ट्रवादीच्या नऊ आमदारांचा शपथविधी पार पडला. शिंदे भाजप सरकारमध्ये राष्ट्रवादी सामील झाली. महाराष्ट्रातील मतदारांना काही कळण्याच्या राष्ट्रवादीसोबत मंत्री मंडळ विस्तारही झाला. या शपथविधीमुळे राज्याच्या राजकारणातील समीकरणेच बदलून गेली. नाशिक राजकारणात (Chhagan Bhujbal) देखील खळबळ उडाली आहे. काही दिवसांपासून मंत्री मंडळ विस्तार होणार होता, यात नाशिकमधील भाजपाला मंत्रिपदाची संधी दिली जाणार होती, मात्र मंत्रिमंडळ विस्तार झाला खरा, मात्र राष्ट्रवादीचे उडी घेतल्याने भाजपचं मंत्रीपद पाण्यात गेल्याची चर्चा आहे. 


शिंदे फडणवीस सरकारच्या मंत्री मंडळ लवकरच होणार होता. यात शिंदे गटासह भाजपच्या काही आमदारांची मंत्रीपदी वर्णी लागणार होती. यात नाशिकमधून देवयानी फरांदे, राहुल आहेर यासह सीमा हिरेंचे नाव चर्चेत होते. शिंदे गटातील सुहास कांदे यांचे नाव आघाडीवर होते. मात्र या सगळ्यांना डावलत राष्ट्रवादीने सरकारमध्ये सामील होत नऊ मंत्र्यांना मंत्रिपद बहाल केले. अजित पवार यांच्यासोबत छगन भुजबळ यांनी देखील मंत्रिपदाची शपथ घेतल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. छगन भुजबळ यांना मंत्रिपद मिळाल्याने आता नाशिक (Nashik) जिल्ह्याला दोन मंत्रीपदे मिळाले आहेत. कारण दादा भुसेंकडे आधीच मंत्रिपद आहे. त्यामुळे आता भाजपची संधी हुकल्याचे बोलले जात आहे. त्यांचा हिरमोड होण्याची शक्यता आहे. सध्या उत्तर महाराष्ट्राला चार मंत्रीपदे असून त्यात गुलाबराव पाटील, दादा भुसे आता अनिल पाटील आणि छगन भुजबळ यांनाही मंत्रिपद मिळाले आहे. 


सुहास कांदेही अडचणीत? 


दुसरीकडे शिवसेना फुटल्यानंतर नांदगाव मनमाड मतदारसंघाचे आमदार सुहास कांदे (suhas Kande) यांनी शिंदे गटाची वाट धरली. कांदे यांना देखील मंत्री पद मिळणार अशी चर्चा होती. मागील काही दिवसांत छगन भुजबळ यांच्यासह त्यांचे सहकारी दादा भुसे यांच्यासोबत देखील बिनसले होते. मात्र अशातच कालच्या नाट्यांनंतर कांदे अडचणीत सापडले आहेत. कारण छगन भुजबळ आणि सुहास कांदे यांच्या निधी वाटपावरून चांगलाच वाद रंगला होता. अशातच आता राष्ट्रवादी देखील सरकारमध्ये सामील झाल्याने आता सुहास कांदे काय करणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे.  


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Chhagan Bhujbal NCP : शरद पवार आम्हाला म्हणाले की 2024 मध्ये मोदीच पंतप्रधान म्हणून येणार आहे : छगन भुजबळ