Nashik Crime : नाशिक शहरांसह जिल्ह्यात वाढती गुन्हेगारी पोलिसांची डोकेदुखी ठरत आहे. काही दिवसांपासून गुन्हेगारीत काही अंशी रोख बसला असतांना मालेगावातून धक्कादायक बातमी समोर येत आहे. मालेगाव शहरातील रमजान पुरा भागात नवऱ्याने बायकोला ड्रममध्ये बुडवून ठार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
मालेगाव शहरातील रमजान पुरा भागात नवऱ्याने बायकोला ड्रममध्ये बुडवून ठार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. मालेगाव शहरातील रमजान पुरा भागातील द्याने शिवारातील फिरस्ती बाबा दर्ग्याजवळ हि घटना घडली आहे. येथे राहणारे अब्दुल वफा अब्दुल रेहमान याने बायकोवर संशय घेत तिला जीवे ठार मारल्याची घटना उघडकीस आली आहे.
रमजान पुरा भागात खान कुटूंबिय राहते. या दोन्ही नवरा बायकोत सातत्याने भांडणे होत असत. सदर संशयित अब्दुल वफा हा नेहमी पत्नीला मारहाण करीत असे. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत दोघांत नेहमी भांडणे होत असत. दि. २१ जुलै रोजी देखील रात्री अकरा वाजेच्या सुमारास संशयित अब्दुल वफा याने पत्नीवर संशय तीस मारहाण केली. मारहाण केल्यानंतर त्याने तीस पाण्याच्या प्लॅस्टिकच्या ड्रममध्ये बुडवून मारले.
या प्रकरणी रमजान पुरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा केला. तसेच अदनान खान यांनी रमजान पुरा पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार अब्दुल खान यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक थोरात करीत आहेत. तर दुसरी खुनाची घटना येवला तालुक्यात उघडकीस आली आहे.
येवल्यात खून
येवला शहरात देखील खुनाची घटना समोर आली आहे. येथील कोर्ट रोड परिसरात हि घटना घडली आहे. या घटनेत संशयित व मयत हे एकमेकांना ओळखत होते. संशयितांनी संगनमत करून कुठल्यातरी कारणावरून मयत सुधाकर गायकवाड यांच्या डोक्यात हत्याराने वार खून केल्याची घटना घडली. या प्रकरणी येवला शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.