Maharashtra Nashik Accident : नाशिक(Nashik) शहरासह जिल्ह्यात अपघातांची मालिका सुरूच असून नाशिक शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी अपघाताचे प्रमाण वाढले आहे. मागील तीन दिवसांत आठ जणांचा दुचाकी अपघातात मृत्यू (Accident death) झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. त्यामुळे अद्यापही अपघाती मृत्यूचे प्रमाण कमी होताना दिसत नसून यावर पोलिसांनी तात्काळ उपपयोजना करणे आवश्यक असल्याचे दिसते. 


नाशिक (Maharashtra Nashik Accident) शहरासह जिल्ह्यातील मागील चार ते पाच दिवसांत आठ जणांचा अपघाती (Accident) मृत्यू झाला आहे. हे सर्वजण दुचाकीवर प्रवास करत होते. वेगात प्रवास आणि हयगयीने दुचाकी चालविल्याने, शिवाय ट्रिपल शीट दुचाकीवर फिरत असताना अपघात झाले आहेत. यात जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणावर अपघात झाल्याचे समोर आले आहे. 18 फेब्रुवारी रोजी गंगापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत अपघाताची घटना घडली. यात भरत जसबीर रोकाया या 19 वर्षे तरुणाचं निधन झालं. याचबरोबर मित्र पंकज रावल यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. भरत हा दुचाकीवर आनंदवलीकडून जेहान सर्कलकडे जात असताना झाडावर आदळला. यात भरत रोकाया याचा जागीच मृत्यू झाला तर एक मित्राचा जखमी अवस्थेत हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर तिसरा मित्र जखमी झाल्याने उपचार घेत आहे. 


Maharashtra Nashik Accident : नाशिक शहरासह जिल्ह्यात अपघातांची मालिका सुरूच असून जिल्ह्यात ठिकठिकाणी अपघाताचे प्रमाण वाढले आहे.


तर वणी पोलीस ठाण्यातंर्गत एकाच अपघातात (Maharashtra Nashik Accident) तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना 14 फेब्रुवारी रोजी घडली असून 18 फेब्रुवारीला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची माहिती अशी की, वणी बाजूकडून पिंपळगाव बाजूकडे जात असताना संतोष बाळू कराटे यांच्या दुचाकीस अज्ञात चार चाकी वाहनाने धडक दिली. यात दुचाकीवरील तिघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. संतोष विष्णू कराटे, केदु यशवंत कराटे, निवृत्ती सखाराम कराटे अशी निधन झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. तर मालेगाव तालुक्यातील वडनेर खाकुर्डी पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यानुसार अभिमन भिका अहिरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचा मुलगा हा दुचाकीवरून जात असताना अज्ञात दुचाकी चालकाने यांच्या मुलाच्या दुचाकीस समोरून धडक दिली. यात अभिमन अहिरे यांचा मुलगा सुनील अभिमन अहिरे याचा मृत्यू झाला आहे. 


चौथी घटना ही नाशिक शहरातील पंचवटी पोलीस स्टेशन परिसरात घडली आहे. या घटनेतील दुचाकी चालक पराग नरेंद्र जोशी हा चारचाकीने जात असताना मेरी लिंक रोडवरील औदुंबर लॉन्स समोर सिमेंटच्या कट्ट्याला धडकला. या अपघातात त्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचे निधन झाले. तर पाचवी घटना सरकारवाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली असून या घटनेत सलीम सत्तार खाटीक याचं अपघातात निधन झालं आहे. सलीम हा सावरगाव गोवर्धन गंगापूर लिंक रोडने घरी अशोक नगरकडे जात असताना समोरून येणाऱ्या चारचाकीने धडक दिली. यात त्याच्या डोक्यात गंभीर दुखापत झाल्याने उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता त्याचं निधन झालं.