एक्स्प्लोर

MPSC Exam : एमपीएससीच्या जाहिरातीत तांत्रिक घोळ, पत्रकारिता पदवीधरांचा जीव टांगणीला, नेमकं कारण काय? 

Nashik MPSC Exam : पत्रकारितेची पदव्युत्तर पदवी प्राप्त केलेल्या उमेदवारांचे अर्ज स्वीकारले जात नसल्याचे समोर आले आहे.

Nashik MPSC Exam : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) वतीने माहिती व जनसंपर्क विभागातील (Information and Public Relations Department) विविध पदांकरिता जाहिरात प्रसिद्ध केली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. मात्र ऑनलाईन प्रक्रियेत तांत्रिक त्रुटी असल्याने पत्रकारितेची पदव्युत्तर पदवी प्राप्त केलेल्या उमेदवारांचे अर्ज स्विकारले जात नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अनेक पत्रकारिता पदव्युत्तर पदवीधारकांचा जीव टांगणीला लागला आहे. 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सामान्य प्रशासन विभागाच्या मागणीपत्रानुसार माहिती व जनसंपर्क विभागाकडील उपसंचालक, जिल्हा माहिती अधिकारी व माहिती अधिकारी या वर्ग-1 व वर्ग-2 पदांची जाहिरात प्रसिध्द केली आहे. या भरती प्रक्रियेतील जाहिरातीत स्पष्टपणे पत्रकारितेतील पदवी नमूद केले असतांनाही उमेदवार जेव्हा ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी जातो, तेव्हा त्याला ‘आपल्याकडे सदर पदांसाठी आवश्यक असलेली शैक्षणिक अर्हता नसल्यामुळे अर्ज करण्यास पात्र नाहीत’ असा संदेश येतो. त्यामुळे राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना या पदांसाठी ऑनलाईन अर्ज करता येत नाही. पत्रकारितेची बॅचलर व डिप्लोमा ही डिग्री घेतलेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करता येत आहे. मात्र पत्रकारिता व जनसंपर्क विषयात ख्यातनाम विद्यापीठातून कला पारंगत पदवी (पदव्युत्तर पदवी) घेतलेले विद्यार्थी अपात्र ठरत असल्याचे पत्र छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी शासनांस पाठविले आहे. 

छगन भुजबळ यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने उपसंचालक, जिल्हा माहिती अधिकारी व माहिती अधिकारी या पदांसाठी जम्बो भरतीची जाहिरात प्रसिध्द केली आहे. या जाहिरातीसाठी पत्रकारिता व जनसंपर्क क्षेत्रातील उच्च शैक्षणिक अर्हता असतांनाही उमेदवारांचे ऑनलाईन अर्जासाठी अपात्र असल्याचे संदेश येत आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या हेल्पलाईनच्या माध्यमातून उमेदवारांना समाधानकारक उत्तर मिळत नसल्यामुळे राज्यातील लाखो पत्रकारिता पदव्युत्तर पदवीधारकांचा जीव टांगणीला लागला आहे. कधी नव्हे अनेक वर्षापासून उपलब्ध झालेली संधी एमपीएससीच्या चुकीच्या ऑनलाईन प्रक्रीयेमुळे गमाविण्याची भीती तरूणांमध्ये निर्माण झाली असल्याचे म्हटले आहे. याबाबत तातडीने तांत्रिक तृटी दूर करून पदव्युत्तर पदवी धारकांचे अर्ज स्वीकारण्यात येऊन अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
  

मुदत वाढविण्यात यावी... 

आपल्या यापूर्वीच्या जाहिरातीत पदांसाठी सुरूवातीस ऑनलाईन अर्ज भरतांना पत्रकारितेची पदव्युत्तर पदवी धारकांना अडचणी आल्या होत्या. कालातरांने त्यात दुरूस्ती करण्यात येऊन अर्ज स्विकारले गेले होते. तेव्हा सध्याच्या जाहिरात क्र.129, 130 व 131 च्या माध्यमातून ही पत्रकारितेच्या पदव्युत्तर पदवीधारकांना ऑनलाईन अर्ज करतांना मुदत संपण्याच्या आत तात्काळ दिलासा देण्यात यावा. तसेच या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत ही वाढविण्यात यावी अशी मागणी छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे.

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

महत्त्वाच्या बातम्या

नाशिक TCS प्रकरण! MIM च्या नगरसेवकाला पोलिसांनी घेतलं ताब्यात, आरोपी निदा खानला मदत केल्याचा ठपका 
नाशिक TCS प्रकरण! MIM च्या नगरसेवकाला पोलिसांनी घेतलं ताब्यात, आरोपी निदा खानला मदत केल्याचा ठपका 
Raj Thackeray : भेटायचं नव्हतं तर कशाला बोलावलं, राष्ट्रकुल सुवर्ण पदक विजेता खेळाडू दिलीप गावित आणि कोच वैजनाथ काळे राज ठाकरेंना भेटताच निघून गेले
राज ठाकरेंच्या भेटीसाठी दीड तास थांबावं लागलं, सुवर्णपदक विजेता खेळाडू आणि प्रशिक्षकाचा संताप
Pravin Darekar on Manoj Jarange Patil: 'फडणवीस एका व्यक्तीमुळे नाही, अठरापगड जातींच्या ताकदीवर मुख्यमंत्री झाले'; प्रवीण दरेकरांचा मनोज जरांगेंवर पलटवार
'फडणवीस एका व्यक्तीमुळे नाही, अठरापगड जातींच्या ताकदीवर मुख्यमंत्री झाले'; प्रवीण दरेकरांचा मनोज जरांगेंवर पलटवार
Nashik Crime News: कंट्रोल रूमला डायल 112 वर आला फोन, पोलिसांची एकच धावपळ; घटनास्थळी पोहोचताच संपूर्ण यंत्रणा चक्रावली, नाशिकमध्ये नेमकं काय घडलं?
कंट्रोल रूमला डायल 112 वर आला फोन, पोलिसांची एकच धावपळ; घटनास्थळी पोहोचताच संपूर्ण यंत्रणा चक्रावली, नाशिकमध्ये नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nagpur Crime: वेळेत डिलिव्हरी करणं पडलं महाग! सहकाऱ्यानंच डिलिव्हरी बॉयचा काटा काढला; ऑनलाइन कंपनीतील कामगिरीच्या स्पर्धेतून जीवघेणा हल्ला, दोघांना अटक
वेळेत डिलिव्हरी करणं पडलं महाग! चांगला इन्सेंटिव्ह मिळवतो म्हणून सहकाऱ्यानंच डिलिव्हरी बॉयचा काटा काढला; दोघांना अटक, नागपूर हादरलं
AI Deepfake Ban Rules : एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
Maharashtra Live blog updates: सोलापूर जिल्हा परिषदेतील सभागृहाचे नाव बदलाला राष्ट्रवादी शरद पवार गट आणि संभाजी ब्रिगेडचा विरोध
Maharashtra Live blog updates: सोलापूर जिल्हा परिषदेतील सभागृहाचे नाव बदलाला राष्ट्रवादी शरद पवार गट आणि संभाजी ब्रिगेडचा विरोध
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
Eknath Shinde and PM Modi: सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्षाचा खटला निर्णायक वळणावर, जेन झी आंदोलनाचेही पडसाद, एकनाथ शिंदे पंतप्रधान मोदींना भेटणार
सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्षाचा खटला निर्णायक वळणावर, जेन झी आंदोलनाचेही पडसाद, एकनाथ शिंदे पंतप्रधान मोदींना भेटणार
Nikita Rawal Angry On Ranbir Kapoor: 'गोमांस खाणारा राम कसा साकारू शकतो?'; 'रामायण'मध्ये रणबीर कपूरच्या कास्टिंगवर प्रसिद्ध अभिनेत्रीचा आक्षेप, चालवतेय बायकॉट ट्रेंड
'गोमांस खाणारा राम कसा साकारू शकतो?'; 'रामायण'मध्ये रणबीर कपूरच्या कास्टिंगवर प्रसिद्ध अभिनेत्रीचा आक्षेप, चालवतेय बायकॉट ट्रेंड
Womens Asia Cup 2026 : आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
Manoj Jarange Patil and Pravin darekar: फडणवीसांवर टीका करताच प्रवीण दरेकरांनी मनोज जरांगेंची अक्कलच काढली, म्हणाले, 'नाक्यावर आंदोलन करणं आणि...'
फडणवीसांवर टीका करताच प्रवीण दरेकरांनी मनोज जरांगेंची अक्कलच काढली, म्हणाले, 'नाक्यावर आंदोलन करणं आणि...'
Embed widget