Nashik Grampanchayat Election : नाशिक (Nashik) जिल्ह्यातील सुरगाणा (Surgana) तालुक्यातील 61 ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल हाती आला असून यामध्ये माकपचा लाल बावटा पुन्हा एकदा सरशी ठरला असून जवळपास 34 जागांवर विजय मिळवला आहे. तर राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष असून 08 जागा मिळाल्या आहेत. पेठ नंतर सुरगाणा तालुक्यातही भाजप आणि शिंदे गट पिछाडीवर असल्याचे चित्र पाहायला मिळाले. 


नाशिक जिल्ह्यातील चार तालुक्यातील निवडणूक निकाल घोषित होत असून आतापर्यत चारही तालुक्यातील काही ग्रापंचायतींचा निकाल हाती आला आहे. त्यानुसार जिल्ह्यात राष्ट्रवादीची सरशी असून त्या पाठोपाठ शेवटच्या घटकात शिवसेनेने मुसंडी मारली आहे. दरम्यान सुरगाणा तालुक्यातील 61 ग्रामपंचायतींसाठी आज सकाळपासून मतमोजणी प्रक्रिया सुरु होती. सुरवातीपासूनच लाल बावटा सरशी घेतली होती. त्यानंतर काही ठिकाणी राष्ट्रवादीचे घड्याळ आघाडी घेतली. तर अन्य पक्षांना मात्र अल्पशा जागांवर समाधान मानावे लागले आहे. 


दरम्यान सुरगाणा तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकांत मतमोजणीच्या सर्व फेऱ्या पूर्ण झाल्या असून अंतिम निकाल हाती आला आहे. त्यानुसार गेल्या अनेक वर्षांपासून वर्चस्व असलेल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा लाल बावटा तालुक्यात फडकला आहे. तर पेठ तालुक्यानंतर अपक्षांनी देखील जोरदार मुसंडी मारत 06 जागांवर विजय मिळवला आहे. तर राज्यात सरकार असलेल्या शिंदे गटाला मात्र एकही जागा मिळाली नसल्याचे चित्र आहे. भाजपने मात्र 03 बळकावत कमळाची मोहोर उमटवली आहे. सुरगाणा तालुक्यातील एकूण 61 ग्रामपंचायतींपैकी माकप 34, राष्ट्रवादी 08, शिवसेना 03, अपक्ष 04, भाजप 03, इतर पक्ष 08 अशी आकडेवारी मिळाली आहे. 


तर सुरगाणा तालुक्यातील खोकरी ग्रामपंचायत मध्ये काका पुतण्या सदस्य पदासाठी उभे होते. मात्र या चुरशीच्या लढाईत पुतण्याचा पराभव झाला आहे. तर कुकुडणे यंतेहील ग्रामपंचायत मध्ये वार्ड क्रमांक एकमध्ये दोन उमेदवारांना समान मते मिळाल्याने चिठ्ठीवर चिठ्ठीवर निवडणूक घेण्यात आली. 


सुरगाणा तालुक्यातील 61 ग्रामपंचायतींचा निकाल 
उंबरपाडा - चिमण लक्ष्मण पवार (ग्रामविकास आघाडी), घोडांबे - माया भोये (माकप), शिंदे दिघर - पुंडलिक पवार (राष्ट्रवादी काँग्रेस), रोकडपाडा - अनिता राजू पवार (राष्ट्रवादी काँग्रेस), सराड - नामदेव भोये (अपक्ष), डांगराळे - रतन आबाजी गावित (शिवसेना), राहुडे - सुषमा विष्णू गांगुर्डे (शिवसेना) , प्रतापगड - वनिता विजय दळवी (भाजप), माळेगाव- अनिता भागवत गवळी माकप, कळमणे- पांडुरंग गावित माकप, बिवळ- हेमलता हेमंत भुसारे माकप, चिकाडी- सदू मनोहर बागुल माकप, हातरुंडी- आनंदा पांडुरंग पवार माकप, करंजुल- प्रभा भिका राठोड माकप, कुकुडमंडा- यशवंत वाघमारे माकप, डोल्हारे-  राजेंद्र गावीत राष्ट्रवादी, पोहाळी- सुनिता दळवी माकप, अंबाठा- हरी महारु चौरे माकप, बोरगाव- अशोक उत्तम गवळी राष्ट्रवादी, नागशेवडी- भारती बागुल  माकप, बुबळी- पप्पू राऊत माकप, हट्टी- सुशिला हिमतन गायकवाड माकप, मालग्वहाण- योगेश ठाकरे अपक्ष, भदर- झेंपा थोरात भाजप, माणी- कल्पना यशवंत चौधरी माकप, भोरमाळ-  बागुल माकप, कोठुळा- काजल गणेश गुंबाडे - अपक्ष, भवानदगड- धनश्री हाडळ- माकप, खुंटविहीर- आनंदा यशवंत झिरवाळ, खोकरी- काशिनाथ गवळी - गाव विकास आघाडी अपक्ष, पळसन- रंजना विठ्ठल चौधरी माकप, काठीपाडा- रोहिणी चंद्रकांत वाघेरे, म्हैसखडक- संगिता तुकाराम देशमुख- राष्ट्रवादी, राशा- सिताराम भोये माकप, चिंचपाडा-  चौधरी   माकप, मांधा- मिरा तुळशिराम महाले राष्ट्रवादी, कुकुडणे-मजित जयराम चौधरी भाजपा, बा-हे- वैशाली देविदास गावित माकप, उंबरठाण- गिरीश काशीराम गायकवाड माकप, जाहुले- अनुसया सुनील भोये भाजपा, हस्ते- पुंडलिक परशराम बागुल ग्रामविकास पॅनल आघाडी, मांगधे- भारती चंद्रकांत भोये आघाडी भा. रा. आघाडी, वरंभे- कौशल्य भास्कर चव्हाण माकप, मनखेड- नर्मदा मोहनदास भोये  भा. रा. आघाडी, गोंदुणे- संजाबाई खंबायत  माकप, हेमाडपाडा- पुंडलिक परशराम घांगळे  महा विकास आघाडी, रोघांणे- सविता सुरेश गायकवाड माकप, ठाणगाव- मनिषा योगेश महाले माकप, बेडसे- भाऊ काळू भोंडवे- माकप, अंबोडे- राजेंद्र निकुळे भाजप, खिर्डी- शिवराम वळवी माकप, भवाडा- कुसूम हरी जाधव माकप, वाघधोंड-रंजना सावळीराम देशमुख राष्ट्रावादी, लाडगाव- संजिवनी जीवन चौधरी माकप, खोबळा- पांडुरंग गायकवाड माकप, हतगड- देविदास दळवी अपक्ष, अलंगुण- हिरामण जिवा गावित माकप - बिनविरोध, मोहपाडा- बिनविरोध- साजोळे-  काशिराम गायकवाड बिनविरोध राष्ट्रवादी, हरणटेकडी, सरपंच - कौशल्या भास्कर चव्हाण, पक्ष - स्थानिक आघाडी, मोहपाडा सरपंच -शांताबाई अंबादास पवार,पक्ष - अपक्ष.