Nashik Grampanchayat Election : नाशिक (Nashik) जिल्ह्यातील 88 ग्रामपंचायतींच्या मतदानाला भर पावसात सुरुवात झाली असून भर पावसात देखील नागरिक आपल्या मतदानाचा हक्क बजावत आहेत. त्यामुळे हे मतदान सायंकाळपर्यंत सुरू होणार असून जिल्ह्यातील तीन तालुक्यात हे मतदान सुरू आहे. नाशिक जिल्ह्यातील तीन तालुक्यात मतदानाचा बिगुल वाजला असून सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली आहे मात्र गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे चा परिणाम होतो की काय असा अशी शंका सध्या उमेदवारांसह कार्यकर्ते उपस्थित करत आहेत नाशिक जिल्ह्यातील नाशिक कळवण दिंडोरी या तालुक्यांमध्ये सध्या 88 ग्रामपंचायतींमध्ये मतदान सुरू आहे.. या मतदान  प्रक्रियेसाठी 1746 अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. असे असताना मात्र पावसाने खोळंबा घातला असला तरी मतदार मात्र न चुकता मतदान करत असल्याने चित्र आहे. 


आज सकाळ पासूनच मतदान सुरू झाले असून नाशिकच्या 16, कळवण 22 तर दिंडोरीच्या 50 ग्रामपंचायतीचा यामध्ये समावेश आहे. दरम्यान शिंदे फडणवीस सरकारने सरपंच थेट जनतेतून यानुसार थेट सरपंच पदासाठी 259 तर सदस्यांसाठी 934 उमेदवार रिंगणात आहेत. तीन तालुके मिळून संपूर्ण 88 ग्रामपंचायतींच्या निवडणुका असून 241 प्रभाग पाडलेले आहेत. या निवडणुकीत उल्लेखनीय बाब म्हणजे नऊ सरपंच पदाचे उमेदवार बिनविरोध तर सदस्य पदासाठी तब्बल 334 जागा बिनविरोधात निवडून आले आहेत. 


सरपंच थेट जनतेतून 
शिंदे भाजप सरकार सत्तेत आल्यानंतर तत्कालीन भव्य सरकारने बदललेला सरपंच थेट जनतेतून हा निर्णय पुन्हा पारित केला व आता या तीन तालुक्यांमध्ये याच पद्धतीने निवडणुका होत असून एका नागरिकाला दोन मतदान करावे लागणार आहे. एक सदस्य पदासाठी तर एक सरपंच निवडीसाठी. राज्यपातळीवर मुख्यमंत्रीपद हे जसे सर्वोच्च असते तसेच खेडेगावामध्ये सरपंचपद हे सर्वोच्च असते. गावचा कारभार सरपंच उपसरपंच ग्रामसेवक यांच्या मदतीने हा कारभार पाहिला जातो. आता थेट जनतेतून सरपंच निवडणे म्हणजेच जनता सरपंच पदासाठी उभे असलेल्या उमेदवारांनाच मतदान करणार आहे. ग्रामपंचायतीत कमीत कमी सात आणि जास्तीत जास्त 17 सदस्य गरजेचे असतात आता या सदस्यांना जनता मतदान करून निवडून देणार आहे. तसेच आता सरपंच निवडण्यासाठी देखील जनतेचा कौल महत्त्वाचा ठरणार आहे. त्यासाठी आता मतदारांना दोन वेळा मतदान करावे लागेल. यंदाची निवडणूक चुरशीशी होणार यात शंका नाही 


नाशिकसह जिल्ह्यात संततधार सुरूच!
मागील तीन दिवसांपासून सुरू असलेला पाऊस अद्यापही कायम असून पावसाने धुमाकूळ घातला आहे. अनेक भागात शेती पिकाचे नुकसान झाले असून नवीन आल्यांना पूर देखील आला आहे. अशातच नाशिक जिल्ह्यातील तीन तालुक्यातील ग्रामपंचायत 88 ग्रामपंचायतीच्या मतदानाला सकाळपासून सुरुवात झाली असून भर पावसात मतदान करण्यात येत आहे. सायंकाळी पाच वाजेपर्यंत हे मतदान सुरू राहणार असून या माध्यमातून ग्रामपंचायत सदस्य तसेच सरपंच थेट जनतेतून निवडून दिला जाणार आहे.