Nashik Shinde Gat : नाशिककरांनो अडीनडीला कधीही फोन करा, शिंदे गटाचे संपर्क कार्यालय तुमच्यासाठी सदैव खुले राहील, त्यामुळे बिनदिक्कतपणे आपल्या समस्या, तक्रारी आमच्यापर्यंत घेऊन या, असे आवाहन शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज नाशिकमध्ये शिंदे गटाचे संपर्क कार्यालयाचे उदघाट्न करण्यात आले. 


शिवसेनेमध्ये दोन गट पडल्यानंतर निवडणूक आयोगाने (Election Commission) दोन पक्षाला वेगवेगळे नाव दिलेले आहेत. एकनाथ शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव दिल्यानंतर याच नावाचं मुंबईनंतर (Mumbai) नाशिकमध्ये पहिलं कार्यालय स्थापन करण्यात आलेल आहे. तसेच राज्यातही अनेक ठिकाणी शाखा तसेच संपर्क कार्यालय उभारणीचे काम सुरु आहे. मात्र नाशिकमधील कार्यालयच आज उदघाट्न झाला आहे. बाळासाहेबांची शिवसेना नाशिक कार्यालय हे भव्य नाव असलेले असं कार्यालय आहे. नाशिक शहरातील जिल्हा परिषदेच्या जवळ खासदार हेमंत गोडसे यांच्या कार्यालयाच्या बाजूलाच उभ करण्यात आलेल आहे. विशेष याच रस्त्यावर शालिमार परीसरात ठाकरे गटाच्या शिवसेनेचे मध्यवर्ती कार्यालय आहे.  


आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक दौऱ्यावर आले असता त्यांचं शिंदे गटाकडून जल्लोषात स्वागत करण्यात आले. शालिमार परिसरात उभारण्यात आलेल्या शिंदे गटाच्या संपर्क कार्यालयाचे उदघाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. मुंबईनंतर राज्यातील हे दुसरे महत्वाचे संपर्क कार्यालय म्हणून ओळखले जाईल, शिवाय अडीनडीला कधी फोन करा, नाशिकरांसाठी शिंदे गटाचे हे कार्यालय कधीही खुलं राहील, असं उदघाटनावेळी पदाधिकाऱ्यांनी सांगितले. 


दरम्यान या प्रवेशद्वारावरच बाळासाहेब ठाकरे यांचे पोस्टर आणि वाघाचे चित्र लावण्यात आलेले आहे. बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचं आणि शिंदे गटाचं हे पहिलं संपर्क कार्यालय आहे, ज्याची बांधणी नाशिक मध्ये झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्या नाशिक दौऱ्यावर आहेत आणि त्यांच्या हस्ते या पहिल्या कार्यालयाचे उद्घाटन होणार आहे. प्रवेशद्वारावरच बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा लावण्यात आलेली आहे. बरोबर वाघाचं इथे चिन्ह देखील आहेत. एकूणच या कार्यालयाचा जर आपण आढावा घेतला तर एक कॉर्पोरेट लूक या ऑफिसला देण्यात आलेला आहेत. इथेच बाजूला नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांचे देखील कार्यालय आहे आणि याच कार्यालयाला लागून हे ऑफिस सुरू करण्यात आलेले आहे. 


बाजूलाच शिवसेना कार्यालय 
दरम्यान शिंदे गटाच्या नाशिक कार्यालयात संपर्कप्रमुख, जिल्हाप्रमुख त्याचबरोबर महानगर प्रमुख यांचे कार्यालय आहेत. इथूनच ह्या सर्व पदाधिकाऱ्यांचा कारभार हा चालणार आहे. कार्यालयाच्या एका बाजूला कार्यालयीन स्टाफसाठी स्वतंत्र जागा तयार करण्यात आली आहे. याच ठिकाणाहून सर्व सोशल मीडियाची काम हँडल केली जातील आणि ती सोशल मीडियामध्ये प्रसार माध्यमांमध्ये वितरित केल्या जातील, असे दिसते आहे. शिंदे गटाच्या शिवसेनेला नेमका कसा प्रतिसाद मिळतो हे बघणे तेवढेच महत्त्वाचा असून भविष्यामध्ये नाशिक शहरांमध्ये, जिल्ह्यामध्ये आपली फळी निर्माण करण्याचं एक मोठं आव्हान या सर्व पदाधिकाऱ्यांसमोर असणार आहे.