Chhagan Bhujbal NCP : 'साहेबांबद्दल आजही आमच्या मनात प्रेम, अजूनही बिघडलेलं नाही, लोक म्हणतात शरद पवार यांचा फोटो का लावला, ते आमचे विठ्ठल आहेत. आम्ही तुमच्यासोबत आहोत, आम्हाला पोटाशी धरून आशीर्वाद द्यायला या', असे आवाहन राष्ट्रवादीचे नेते मंत्री छगन भुजबळ यांनी केला. तसेच, तुमच्या भोवती जे बडवे आहेत, त्या बडव्यांना बाजूला करा, असा घणाघात भुजबळांनी (Chhagan Bhujbal) नेमका कुणावर केला? हा प्रश्न अनुत्तरित आहे. 


आज अजित पवार (Ajit Pawar) गटाची मुंबईतील एमईटी भुजबळ नॉलेज सिटीमध्ये (Mumbai) बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत छगन भुजबळ बोलत होते. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पहिलेच भाषण जोरदार केले आहे. राष्ट्रवादी पक्षातील अंतर्गत वादावर त्यांनी सडकून टीका केली. अनेकजण विचारतात की, नियमाच्या बाहेर जाऊन आम्ही काम करतो, मात्र कायदे आम्हालाही कळतात, अशी कारवाई होईल तशी कारवाई होईल, असा आरोप होत आहे. तुमच्या बरोबर कार्यकर्ते, आमदार, जिल्हाध्यक्ष आहेत का? असे प्रश्न विचारले जात आहेत. मात्र सर्वजण आमच्याबरोबर असून काय कायदे आहेत? हे सर्व आम्हाला ठाऊक आहे. या सगळ्याचा विचार करून राष्ट्रवादी पक्षाने हे पाऊल उचलले असल्याचे भुजबळ म्हणाले. 


छगन भुजबळ यांनी बैठकीची सुरवात प्रास्ताविकाद्वारे केली. यावेळी ते म्हणाले की, आमच्या निर्णयानंतर सर्वाना आश्चर्याचा धक्का बसला, काही दिवसांत अनेक गोष्टीचा उलगडा होईल. चाळीसपेक्षा जास्त आमदार आमच्या पाठीशी असून कुणी परदेशात आहेत, कुणी ट्रॅफिकमध्ये अडकले आहेत. प्रतिज्ञापत्रावर अनेकांच्या सह्या घेतल्या आहेत. दरम्यान राष्ट्रवादी पक्षांतर्गत सुरु असलेल्या वादावर ते म्हणाले की, अनेक वेळा सांगूनही नेमणूक होत नव्हत्या, कार्यकर्ते नसतील तर पक्ष काम कसा करू शकतो, याबाबत शरद पवार साहेबाना अनेकवेळा सांगितलं. आतापर्यंत थांबलेलं होत, सांगणूही होत नव्हतं, अजित दादांनी देखील अनेकवेळा सांगितलं होत. त्यामुळे कामे होत नसतील तर मी करायला तयार आहे, असेही म्हणाले होते. मात्र तसे घडले नाही. 


बडव्यांना बाजूला करा, ते बडवे कोण? 


यावेळी भुजबळ यांनी मोठा घणाघात केला, ते म्हणाले की, लोक म्हणतात शरद पवार यांचा फोटो का लावला, तर ते आमचे विठ्ठल आहेत. मात्र या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलं आहे. तुमच्या भोवती जे बडवे आहेत, त्या बडव्यांना बाजूला करा, आम्ही तुमच्यासोबत आहोत. आम्हाला पोटाशी धरा. साहेबांबद्दल आजही आमच्या मनात प्रेम असून अजूनही काही बिघडलेलं नाही, आम्हाला आशीर्वाद द्या. अनेकजण म्हणतात की, आम्ही अपात्र होऊ, वैगरे पण असं काही होणार नाही, कुणीही अपात्र होणार नाही, म्हणून घाबरायचं कारण नाही. जोमाने काम सुरु करून कार्यकर्त्यांना न्याय दिल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास यावेळी छगन भुजबळ यांनी व्यक्त केला. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Maharashtra NCP Crisis : आमच्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलंय; छगन भुजबळांचा नेमका रोख कोणाकडे?