gulabrao Patil नाशिक : फडणवीस साहेब असा माणूस आहे की, आम्हाला ओढून आणले आणि घड्याळही बंद केले. विनाकागदाचा बोलणारा नेता म्हणजे फडणवीस आहे, यांच्या डोक्यात 15-20 कॉम्प्युटर  आहे असं वाटते, सभागृह गोल फिरवून टाकतात, असे वक्तव्य मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी केले आहे. 


जल जीवन मिशन व स्वच्छ भारत मिशन टप्पा 2 अंतर्गत जलरथ उद्घाटन सोहळा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हस्ते नाशिकच्या कॉलेज रोडवरील गुरुदक्षिणा हॉल येथे पार पडला. यावेळी गुलाबराव पाटील बोलत होते. मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan), पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) हे देखील कार्यक्रमात उपस्थित होते.


अडीच वर्ष जलयुक्तच काम नाही


मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) म्हणाले की, मागच्या सरकारमध्ये पण मी मंत्री होतो. तेव्हा जलयुक्तला विरोधकांनी टीका केली होती. योगायोग आहे की, परत हे सरकार आले आम्ही त्या सरकारमध्ये होतो. म्हणून माफी मागतो पण अडीच वर्ष जलयुक्तच काम झाले नाही.  


जलरथच्या माध्यमातून मोठं काम होणार


या योजना म्हणजे तिघे मावसभाऊ आहेत. या देशातील मोदी (PM Narendra Modi) हे जादूगार माणूस आहे. गटार, वॉटर, मीटर यावरच आपण राजकारण करत राहिलो. पण, मोदींनी पाण्याच्या बाबतीत मोठं काम केलं आहे. आज आपण 98 टक्के अंगणवाड्या आणि शाळांना जलयुक्ततून पाणी दिले आहे. जलरथच्या माध्यमातून मोठं काम होणार आहे, पाण्याबाबत साक्षरता होणार आहे. फडणवीस साहेब असा काही जीआर काढा की आमदार निधीतून 20 टक्के गाळ काढायला दिले जाईल, अशी मागणी यावेळी गुलाबराव पाटलांनी केली आहे.  


...तर अनेक रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात - दादा भुसे


फडणवीस साहेब तुमचे आभार मानतो. जलरथ उद्घाटनासाठी संधी तुम्ही उपलब्ध करून दिली. शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध करून दिले तर अनेक रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. मध्यंतरीच्या काळात मागचे अडीच वर्ष जलयुक्तचे काम झाले नाही ही वस्तुस्थिती आहे.  डिझेलसाठी डीपीडीसीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून दिला पाहिजे.  थेंब आणि थेंब वाया जाणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे.  जलरथच्या योगदानाबाबत भारतीय जैन संघटनेचे आभार मानतो, असे पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) म्हणाले.


आणखी वाचा 


उद्धव ठाकरेंच्या घणाघाती टीकेनंतर फडणवीसांचा पलटवार, म्हणाले, ठाकरेंच्या डोक्यावर परिणाम झालाय