नाशिक : कुख्यात गँगस्टर व दहशतवादी अबू सालेमला (Abu Salem) काही दिवसांपूर्वी नवी मुंबईतील तळोजा कारागृहातून (Taloja Jail) कडेकोट बंदोबस्त आणि कमालीची गोपनीयता पाळत नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात (Nashikroad Central Jail) आणण्यात आले होते. कारागृहातील अंडासेलमध्ये (Anda Cell) त्याला ठेवण्यात आले होते. मात्र काल रात्री मोठ्या पोलीस बंदोबस्तात नाशिकरोड रेल्वे स्थानकावरून (Nashikroad Railway Station) एका रेल्वेने अबू सालेम दुसरीकडे हलवण्यात आले आहे.
अबू सालेम हा मुंबई साखळी बॉम्ब स्फोटातील (Mumbai Bomb Blast Case) प्रमुख आरोपी आहे. नाशिकरोड कारागृहातील अंडासेलमध्ये अबू सालेमचा महिनाभरापासून मुक्काम होता. तळोजा कारागृहातून सुरक्षेच्या कारणास्तव अबू सालेमचा नाशिकच्या कारागृहात हलवण्यात आले होते. अबू सालेमला महत्त्वपूर्ण सुनावणीसाठी कोर्टात (Court) हजर केले जाणार आहे. त्यासाठीच कडेकोट बंदोबस्तात एका मोठ्या शहरात हलवण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
कडेकोट बंदोबस्तात दुसऱ्या शहरात हलवले
काल मध्यरात्री नाशिकरोड कारागृहाबाहेर डॉन अबू सालेमला काढण्यात आले आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तसंच, ब्लॅक कॅट कमांडोदेखील (Black Cat Commando) सुरक्षेच्या कारणास्तव तैनात करण्यात आले होते. नाशिकच्या रेल्वेस्टेशनसह जेलरोड (Jailroad) परिसराला छावणीचे स्वरुप आले होते. अबू सालेमला कडेकोट बंदोबस्तात एक बड्या शहरात हलवण्यात आले आहे.
अबू सालेमला आता कोणत्या कारागृहात ठेवणार?
सुरक्षेच्या कारणास्तव हे शहर कोणते आहे? याचा मात्र खुलासा अद्याप करण्यात आला नाही. अबू सालेमला त्याची हत्या केली जाईल अशी भीती होती, त्यामुळं त्याला दुसऱ्या शहरात हलवण्यात आले आहे. ज्या रेल्वेतून अबू सालेमला नेण्यात आले होते. त्या रेल्वेच्या विशेष बोगीची श्वान पथकाकडून तपासणीदेखील करण्यात आली होती. मात्र, अबू सालेमला आता कोणत्या कारागृहात ठेवणार? याबाबत अजून स्पष्टता नाही.
इतर महत्वाच्या बातम्या