Devendra Fadnavis नाशिक : नाशिकच्या सातपूर पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीचे उद्घाटन फीत कापून गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हस्ते पार पडले. यावेळी त्यांच्यासमवेत मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) आणि पालकमंत्री दादा भूसे (Dada Bhuse) उपस्थित होते. 


देवेंद्र फडणवीसांनी पोलीस ठाण्याची पाहणी केल्यानंतर त्यांनी स्वतः पोलीस ठाण्यातील (Satpur Police Station) खुर्चीवर बसत 'मी अपेक्षा करतो हे पोलीस ठाणे जनसामान्यांना न्याय देण्याचे काम करेल, असे लिहीत पोलीस दलाला शुभेच्छा दिल्या आहेत. 


पोलीस ठाण्यात नागरिकांना भीती नाही तर न्याय मिळावा


यावेळी भाषण करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सातपूर पोलीस स्टेशनची आधुनिक आणि सुसज्ज इमारत तयार केली आहे. इंग्रज काळात पोलीस दल शासनासाठी आज पोलीस दल नागरिकांची सेवा करण्यासाठी आहे. पोलीस ठाण्यात नागरिकांना भीती नाही तर न्याय मिळावा हा आमचा प्रयत्न आहे. 


नाशिकचे सीपी चांगले काम करतायत


पोलीस ठाण्याच्या आकृतीबंधासाठी नवीन नियम, पोलीस स्टेशनही वाढवण्यात येतील. सीसीटीएनएस प्रणालीच्या माध्यमातून सर्व कामकाज ऑनलाईन झाले आहे. कोणालाही एफआयआरमध्ये बदल करता येत नाही.  नुसती चांगली बिल्डिंग करून फायदा नाही, पीआयला सांगतो ईथे कामही चांगल व्हायला पाहिजे. कामही सुंदर केले पाहिजे. नाशिकचे सीपी चांगले काम करतायत, गुंड गुंडगिरी करणार नाही, यासाठी ते काम करतील अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे. 


नवीन इमारतीत अत्याधुनिक दर्जाच्या सोयीसुविधा


सातपूर पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीमध्ये सुसज्ज अत्याधुनिक दर्जाच्या सोयीसुविधा आहेत. वरिष्ठ निरीक्षकांसह अधिकारी वर्गासाठी स्वतंत्र दालन, अंमलदार व तक्रारदारांसठीची स्वतंत्र दालन आहे. इमारत ही दुमजली असल्याने पोलिसांच्या कामाकाजाच्या दृष्टीकोनातून विभागवार सोयी उपलब्ध केलेल्या आहेत.


पोलिसांनी जनतेचे सेवक म्हणून काम करावे


34 व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा 2024 च्या समारोप समारंभाप्रसंगी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पोलीस दलात भरती होतांना घेतलेली शपथ स्मरून पोलिसांनी शासक म्हणून नाही तर जनतेचे सेवक म्हणून आपले कर्तव्य निभवावे. ताणतणावापासून दूर राहण्यासाठी खेळ महत्वपूर्ण आहेत.  खेळामुळे एक संघ भावना तयार होवून आव्हाने पेलण्याची स्फूर्ती व शक्ती मिळत असल्याने खेळाडू प्रत्येक क्षेत्रात आपली चमक दाखवत असतो. यासारख्या क्रीडा स्पर्धांमुळे राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर उत्कृष्ट कामगिरी करण्याची प्रेरणा मिळत असते, असे फडणवीस म्हणाले. 


इतर महत्वाच्या बातम्या 


मोठी बातमी! उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना नाशिकमध्ये दाखवले काळे झेंडे, युवक काँग्रेस आक्रमक


Gulabrao Patil : "फडणवीस साहेब असा माणूस आहे की, आम्हाला ओढून आणलं अन् घड्याळही बंद केलं" : गुलाबराव पाटील