नाशिक : मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आज नुकसानग्रस्त भागाचा दौरा करणार आहेत. परंतु त्यांच्या दौऱ्याला येवला (Yeola) मतदारसंघातून विरोध होत आहे. भुजबळांच्या दौऱ्याला मराठा समाजाने विरोध केला आहे. आम्ही नुकसान सोसू पण तुम्ही बांधावर येऊ नका, अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतली. तसंच शासन दरबारी भांडून आम्हाला निधी उपलब्ध करुन द्या, पण आमच्या बांधावर येण्याचा अट्टाहास का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. इतकंच नाही तर सोमठानदेश गावात भुजबळ गो बॅकच्या घोषणा देखील देण्यात आल्या. त्यांच्या दौऱ्याला विरोध करणारे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
छगन भुजबळ यांना त्यांच्याच येवला मतदारसंघातुन विरोध होत आहे. छगन भुजबळ उद्या गारपीटग्रस्त भागाचा दौरा करणार आहेत. दौऱ्या आधीच छगन भुजबळ यांच्या दौऱ्याला विरोध झाल आहे. भुजबळ यांच्या दौऱ्याला विरोध करणारी एक ऑडिओ क्लिप देखील व्हायरल झाली आहे. मला गावबंदी कोणी करू शकत नाही, मी कुणाला घाबरत नाही असं भुजबळ म्हणाले.
काय आहे नेमकं संभाषण?
ग्रामस्थ : भुजबळ साहेब तुम्हाला हात जोडून विनंती करतो येऊ नका, आमच्या गावच्या बांधावर येऊ नका....
छगन भुजबळ: बघू काय करायचे ते?
ग्रामस्थ : तुम्ही आले तर वातावरण खराब होईल. सर्व शेतकऱ्यांची विनंती आहे गावाच्या बांधावर येऊ नये
छगन भुजबळ: बरं....
ग्रामस्थ : जमीनीचा 7/12 आमच्या बापाचा आहे.
छगन भुजबळ: मला कोणी म्हटलं या तर मी जाईल, नाही म्हटलं तर बघू...
ग्रामस्थ : तुम्हाला कोणी या म्हणत नाही... आमच्या गावचा ठराव झाला आहे. त्यामुळे तुम्ही येऊ नका..
छगन भुजबळ: तुम्ही चार लोक म्हणजे ठराव होतो का?
मी कुणाला घाबरत नाही : छगन भुजबळ
अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ बुधवारी रात्री येवल्यात दाखल झाले. गुरुवारी सकाळी ते शेतीच्या नुकसानीची पाहणी करणार आहेत. मला गावबंदी कोणी करू शकत नाही, मी कुणाला घाबरत नाही असं भुजबळ म्हणाले. मराठ्यांना जर ओबीसीमध्ये बळजबरीनं टाकलं तर त्यांना काहीच मिळणार नाही, मराठा समाजातील समजूतदार लोकांना हे लक्षात येतं असंही ते पुढे म्हणाले.
हे ही वाचा :