Chhagan Bhujbal on Suhas Kande : नाशिकमधील नांदगाव विधानसभा मतदारसंघात मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे तुतारीचा प्रचार करत असल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे (Suhas Kande) यांनी केला आहे. सुहास कांदेंच्या आरोपामुळे राज्यात मोठी खळबळ उडाली होती. आता यावरून मंत्री छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा आमदार सुहास कांदेंना टोला लगावला आहे. 


आमदार सुहास कांदे यांच्या आरोपांचे मंत्री छगन भुजबळ यांनी खंडन केले. त्यावर मला फारस काही बोलायचं नाही. आम्ही व आमचे लोक महायुतीच्या डॉ. भारती पवार यांचे काम करतोय. त्यांनीही त्यांचे काम करावे दोघांनी मिळून महायुतीचे करावे असा सल्ला मंत्री छगन भुजबळ यांनी त्यांनी येवला दौऱ्यावर असताना सुहास कांदेंना दिला.  


भुजबळांचा कांदेंना टोला 


आमचा आणि आमदार कांदेंचा काही वाद नाही. आमची मागणी एवढीच आहे की, शेतकऱ्यांच्या कांद्यावर कायमस्वरूपी तोडगा काढावा. बाकीच्या कांद्यांवर मलाच काही बोलायचे नाही, असा टोला शब्दात आमदार सुहास कांदेंना मंत्री छगन भुजबळांनी लगावला. मोदींच्या पिंपळगावच्या सभेत मला बोलायची संधी मिळाली तर नक्कीच कांद्याच्या प्रश्नावर पंतप्रधानांचे लक्ष वेधणार, असेही भुजबळ म्हणाले. 


वळसे पाटलांच्या वक्तव्याला भुजबळांचा दुजोरा


तर शरद व पवार व उद्धव ठाकरे यांना सहानुभूती मिळत असल्याच्या मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या वक्तव्याला भुजबळ यांनीही दुजोरा दिला. ते आता बोलताहेत हेच मी तीन आठवड्यापूर्वी बोललो होतो. त्यांच्या सभांना गर्दी होते आहे. त्यामुळे त्यांच्या विधानात तथ्य आहे, असे छगन भुजबळ म्हणाले. छगन भुजबळांच्या या वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.


छगन भुजबळांनी घेतली उद्धव ठाकरेंची बाजू 


घाटकोपर परिसरातील एका पेट्रोल पंपाच्या परिसरात असणारे होर्डिंग कोसळून 14 जणांचा मृत्यू झाला. यावरुन आता राजकारणाला सुरुवात झाली आहे. भाजपचे आमदार राम कदम (Ram Kadam) यांनी उद्धव ठाकरे आणि पेट्रोल पंपाचा मालक भावेश भिंडे (Bhavesh Bhinde) याचा एक फोटो ट्विट केला. हा फोटो ट्विट करत राम कदम यांनी या दुर्घटनेसाठी एकप्रकारे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना जबाबदार धरले. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनीही पालिकेच्या भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन उद्धव ठाकरे यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र छगन भुजबळ यांनी उद्धव ठाकरे यांची बाजू घेतल्याचे दिसून आले. राज्यात आमचं सरकार आहे. मुंबई महानगरपालिकाही प्रशासकाच्या ताब्यात आहे. मग या सगळ्यात उद्धव ठाकरेंचा काय संबंध?, असा सवाल छगन भुजबळ यांनी उपस्थित केला.


इतर महत्वाच्या बातम्या 


Chhagan Bhujbal: राम कदम, किरीट सोमय्यांनी उद्धव ठाकरेंना घेरलं, पण छगन भुजबळांनी घेतली बाजू, म्हणाले...


भुजबळ साहेबांना कोणीही डॉमिनेट करू शकत नाही, त्यांच्यामागे ओबीसींची मोठी ताकद : गोपीचंद पडळकर