Rohit Pawar नाशिक : देशासह राज्यात लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election 2024) रणधुमाळी सुरु आहे. राज्यात महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) किती जागर मिळणार? याबाबत वेगवेगळे अंदाज लावले जात आहेत. तसेच महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून एकमेकांवर आरोपांच्या फैरी सुरु आहेत. आता कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी राज्यात महायुतीला किती जागा मिळणार याची आकडेवारीच मांडली आहे. 


नाशिक (Nashik News) येथे पत्रकार परिषदेत रोहित पवार म्हणाले की, महायुती व मित्र पक्षाकडून मोठ्या निवडणुकीत पैशाचा वाटप सुरु आहे. बारामती (Baramati), अहमदनगरनंतर (Ahmednagar) आता नाशिकमध्ये महायुती पैशाचे वाटप करत आहे.  महायुती राज्यात निवडणुकीत 2 हजार कोटी रुपये खर्च करत आहे. एकट्या बारामतीत 150 कोटी खर्च करण्यात आले आहे. 


आम्ही सत्तेत आल्यानंतर आम्हाला अँटी करप्शन मोहीम हाती घेणार 


चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांचाच विचाराचा आता फुगा फुटला आहे. फोडाफोडीचे राजकारण व राजकारणाचा घसरत चाललेला स्थर हे भाजपच्या मतदारांना आवडलेले नाही. त्यामुळे भाजपचे मतदार बाहेर न निघाल्याने मताचा टक्का घसरला आहे, याचा फायदा महाविकास आघाडीला होणार आहे. आम्ही सत्तेत आल्यानंतर आम्हाला अँटी करप्शन मोहीम हाती द्यावी लागेल, असे रोहित पवारांनी म्हटले आहे.


राज्यात महायुतीला किती जागा? 


महाराष्ट्रात महायुतीला किती जागा मिळणार यावर रोहित पवार यांनी वक्तव्य केले आहे. भारतीय जनता पक्षाला (BJP) 13 ते 14 जागा, शिवसेना (Shivsena) शिंदे गटाला 2 ते 3 जागा आणि राष्ट्रवादी (NCP) अजित पवार गटाला एकही जागा मिळणार नाही, एकूण महायुतीला 16 ते 18 जागा मिळतील, असा दावा रोहित पवार यांनी केला आहे.  


पैसे पैसे वाटपाच्या आरोपावरून महायुती-महाविकास आघाडीत जुंपली 


दरम्यान, अहमदनगर लोकसभा मतदारसंघात उन्हाळ्यातही पैशांची धुवांधार बरसात होत असल्याचा गंभीर आरोप रोहित पवार यांनी केला होता. या संदर्भात त्यांनी एका पोस्टच्या माध्यमातून एक व्हिडिओ देखील पोस्ट केला. गावागावात पाकीट वाटले जात असल्याचा आरोपही रोहित पवार यांनी केला. यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री नाशिकमध्ये आले असताना त्यांनी पैशांच्या बॅगा भरून आणल्याचा आरोप केला. पैसे वाटपाच्या आरोपावरून  महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये चांगलीच जुंपल्याचे दिसून आले. 


आणखी वाचा 


नाशिकमध्ये 800 कोटींचा भूसंपादन घोटाळा, राऊतांचे मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप, थेट PM मोदींना धाडले पत्र