Maharashtra Sadan Scam : महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी मंत्री छगन भुजबळांची (Chhagan Bhujbal) निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. मात्र या नंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी मुंबई हाय कोर्टात याचिका दाखल केली होती. या प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुनावणी होणार आहे. या प्रकरणी छगन भुजबळांनी प्रतिक्रिया दिली आहे. 


अंजली दमानिया यांनी याचिका दाखल केल्यानंतर गेल्या दीड वर्षांपासून सुनावणीला तारीख मिळत नव्हती. मात्र सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी हस्तक्षेप केला. त्यामुळे याचिकेवर आज सुनावणी होत आहे. यावर छगन भुजबळांनी मला आधीच क्लीन चीट मिळाली असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. 


आम्हाला क्लीन चिट


छगन भुजबळ म्हणाले की, महाराष्ट्र सदन घोटाळ्यातून मला क्लीन चिट मिळालेली आहे. फक्त आमच्यातील देशपांडे नावाचे सेक्रेटरी आहेत त्यांची केस मागे राहिली होती. त्यांच्याबद्दलची केस सुरु आहे. आमच्या बद्दलची केस असती तर आम्ही इथे कशाला आलो असतो ताबडतोब गेलो असतो, असे त्यांनी म्हटले आहे. अंजली दमानिया यांचे तुमचे नाव घेतले असे विचारले असता कुणाचे तोंड आम्ही बंद करू शकत नाही, असे भुजबळांनी म्हटले आहे.


काय म्हणाल्या होत्या अंजली दमानिया? 


अंजली दमानिया यांनी ट्विटरवर पोस्ट शेअर करत म्हटले होते की, महाराष्ट्र सदन घोटाळ्यात (Maharashtra Sadan Scam) छगन भुजबळांना निर्दोष सोडण्यात आलं होतं. या प्रकरणातील डिस्चार्जला आव्हान देणारे अपील गेली दीड वर्ष ऐकले जात नव्हते. पाच न्यायाधीशांनी ‘नॉट बिफोर मी’ असे म्हटले होते. सर्वोच्च न्यायालयासमोर एक SLP करून त्यावर ओरडी घेऊन, माननीय CJ यांना योग्य न्यायाधीशांसमोर त्याची लिस्टिंग करण्यासाठी विनंती करण्याचे आदेश मिळाले आहेत. 


नाशिकची जागा कुणालाही मिळो, आम्ही सर्वजण काम करणार


दरम्यान, नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या (Nashik Lok Sabha Constituency) उमेदवारीवर छगन भुजबळ म्हणाले की, नाशिकवरून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पाहू. नाशिकला शिंदे गटाचे सिटिंग खासदार आहेत. भाजपाचे आमदार आणि नगरसेवक जास्त आहेत. त्यामुळे ते नाशिकच्या जागेवर दावा करू शकतात. नाशिकची जागा कुणालाही मिळो. आम्ही सर्वजण काम करणार आहोत, असे त्यांनी म्हटले. 


आणखी वाचा 


Arvind Kejriwal : केजरीवाल यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, तीन पुस्तकांसाठी कोर्टाची परवानगी मागितली, एक पुस्तक सर्वात खास!