Mahayuti Seat Sharing Update : महायुतीमधील जागावाटपाबाबत (Mahayuti Seat Sharing) मोठी अपडेट समोर येत असून, नाशिक (Nashik), धाराशिवच्या (Dharashiv) जागेचा तिढा अखेर सुटला आहे. तसेच नाशिक, धाराशिवची जागा महायुतीत राष्ट्रवादीकडेच राहणार असून, दोन्ही जागेवरील उमेदवारांच्या नावाची घोषणा आजच होण्याची शक्यता आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी (Nashik Lok Sabha Constituency) छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आणि धाराशिव लोकसभा मतदारसंघासाठी (Dharashiv Lok Sabha Constituency) विधान परिषदेचे आमदार विक्रम काळे (Vikram Kale) यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे. 


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा धाराशिवचा उमेदवार अखेर ठरला आहे. धाराशिव लोकसभेसाठी विधानपरिषद आमदार विक्रम काळे यांचे नाव निश्चित करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. विक्रम काळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधान परिषदेचे आमदार आहेत. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आज पत्रकार परिषद घेऊन धाराशिव लोकसभेसाठी विक्रम काळे आणि नाशिक लोकसभेसाठी छगन भुजबळ यांच्या नावाची घोषणा करण्याची शक्यता आहे. आज सकाळीच विक्रम काळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची देवगिरी निवासस्थानी भेट घेतली आहे. 


हेमंत गोडसेंचं काय होणार? 


मागील काही दिवसांपासून महायुतीत नाशिकच्या जागेवरून शिंदेसेना विरुद्ध अजित पवारांची राष्ट्रवादी असा संघर्ष पाहायला मिळत होते. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून विद्यामान खासदार हेमंत गोडसे उमेदवारीसाठी प्रचंड आग्रही असल्याचे पाहायला मिळत आहे. तर, दुसरीकडे राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. अशात महायुतीकडून छगन भुजबळ यांना उमेदवारी जाहीर झाल्याचे निश्चित समजले जात असल्याने हेमंत गोडसे यांचे काय होणार? आणि त्यांची भूमिका काय असणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे. 


धाराशिव मतदारसंघात विक्रम काळेंची अचानक एन्ट्री...


धाराशिव लोकसभा मतदारसंघावर महायुतीतील तिन्ही पक्षांनी एकाचवेळी दावा केल्याने तिढा वाढला होता. शिंदेसेना आणि राष्ट्रवादीत या मतदारसंघासाठी अधिक रस्सीखेच सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत होते. यावेळी भाजपकडून सुद्धा दावा केला जात होता. याचवेळी भाजपकडून सेवानिवृत्त आयएएस अधिकारी प्रवीणसिंह परदेशी यांच्या नावाची चर्चा होती. मात्र, हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे जाणार असल्याने परदेशी यांना घड्याळ चिन्हावर रिंगणात उतरण्याची अट घालण्यात आली होती. पण, परदेशी कमळावरच लढण्यासाठी इच्छुक असल्याने अखेर राष्ट्रवादीने विक्रम काळे यांच्या नावाची घोषणा केली आहे. विक्रम काळे हे मराठवाडा शिक्षक मतदारसंघाचे आमदार आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या : 


Mahayuti Seat Sharing : महायुतीमधील 'या' चार मतदारसंघामुळे जागावाटपाचा तिढा वाढला, वर्षावर पहाटे 3 वाजेपर्यंत बैठका