Chhagan Bhujbal नाशिक : आज संसदेत अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman)  यांनी देशाचा अर्थसंकल्प (Budget 2024) सादर केला. यंदाचे वर्ष निवडणुकीचे वर्ष असल्यामुळे यंदा केंद्र सरकारकडून अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी सर्वसामान्यांसाठी अनेक मोठ्या घोषणा केल्या. या पार्श्वभूमीवर राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. 


छगन भुजबळ म्हणाले की, शिक्षण, पर्यटन, शेतकरी, महिला, राज्यांना कर्ज देणे, दळणवळण सुधारणे अशा अनेक गोष्टींवर अर्थसंकल्पात लक्ष देण्यात आले आहे.  बजेटवर टीका करण्यासारखे काहीही नाही. कॉर्पोरेट टॅक्सवर सवलत देण्यात आलेली आहे.  अनेक नवीन विमानेही येतील. लहान-लहान शहरात मेट्रो आणण्याचा प्रयत्न सरकारचा असणार आहे, असे ते म्हणाले. 


अंतरिम जरी असला तरी सर्वसमावेशक अर्थसंकल्प


ते पुढे म्हणाले की,  मत्स्य व्यवसाय वाढण्यासाठी फार मोठे प्रयत्न सरकारकडून केले जात आहे. राज्यांना बिनव्याजी कर्ज, मोफत धान्य देण्याचाही मोठा निर्णय घेण्यात आला आहे. उच्चशिक्षण संस्था तयार करणार, पर्यटनस्थळांचे ब्रँडिंग, मोफत वीज, 15 एम्स रुग्णालय हे मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञान देण्यासाठी अर्थ सहाय्य देण्यात येणार आहे.  सर्व घटकांमध्ये योजना आखण्याचे ठरण्यात आले आहे. हा अर्थसंकल्प अंतरिम जरी असला तरी सर्वसमावेशक असा आहे, अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली आहे.  


त्या विषयावर नंतर बोलू


मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्याबाबत छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना विचारले असता ते म्हणाले की, सध्या बजेट सुरू आहे तुम्ही तेच दाखवणार आहात, त्या विषयावर नंतर बोलू, असे त्यांनी म्हटले आहे.


काय म्हणाले उद्धव ठाकरे?


शेवटचा अर्थसंकल्प मोदी सरकारने सादर केला आहे. मी काय बोललो शेवटचा.  हे सगळे जादूचे प्रयोग सुरु आहेत. अर्थ संकल्प म्हणजे टोपी घालण्याचा प्रकार आहे. निवडणुका जाहीर झालेल्या नाहीत. मी मागच्या आठवड्यात कल्याण लोकसभा मतदारसंघात फिरलो. आतां म्हटलं तुम्हाला भेटूया. सर्व विधानसभा मतदारसंघामध्ये मी जाणार आहे. याची सुरुवात पेणपासून झाली आहे. शेवटचा अर्थसंकल्प मोदी सरकारने सादर केला आहे. मी काय बोललो शेवटचा. निर्मला सीतारामन यांनी जड अंतःकरणाने हा अर्थसंकल्प मांडल्याचा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला आहे.


आणखी वाचा 


Uddhav Thackeray : "तुम्ही देव मानत असाल, तर माना, पण मोदींची तुलना छत्रपतींशी तुलना करणारे बिनडोक"; उद्धव ठाकरेंचा गोविंदगिरी महाराजांवर हल्लाबोल