Uddhav Thackeray : राम मंदिर (Ayodhya Ram Mandir) उभारले गेले याचा आनंद आहे. राम मोदींची प्रॉपर्टी नाही. या सोहळ्यामध्ये एक निर्बुद्ध मोदींना देव मानत असेल. मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी करत असेल तर ते निर्बुद्धच आहे. ते कोणी असू द्यात, ते निर्बुद्ध आहेत, बिनडोक आहेत, असा हल्लाबोल ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी गोविंदगिरी महाराजांवर (Govindgiri Maharaj) केला आहे. उद्धव ठाकरे हे दोन दिवस रायगड दौऱ्यावर आहेत. पेण येथे त्यांची सभा पार पडली. यावेळी ते बोलत होते. 
 
उद्धव ठाकरे म्हणाले की, हे सरकार मणिपूरमध्ये जात नाही. बोलायला तयार नाहीत. गिते आपला पराभव मागच्या वेळेस झाला. मोदी लाट असताना येथे विरोधातला उमेदवार निवडून आला होता. ४०० पार ते म्हणताय मग नितीश कुमार तुम्हाला का लागले? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. 


ही लोकशाही विरुद्ध हुकूमशाही लढाई


मोदी गॅरेंटी हे म्हणताय. हेमंत सोरेन यांना अटक आणि अजित पवार यांना क्लीन चिट, ही मोदी गॅरेंटी आहे. नितीश कुमार त्यांच्यासोबत गेले. दुसऱ्या दिवशी तेजस्वी यादव आणि लालू प्रसाद यादव यांना ईडीचे समन्स आले ही ही मोदी गॅरेंटी आहे. ही लोकशाही विरुद्ध हुकूमशाही लढाई आहे. 


मी पंतप्रधान म्हणून स्वप्न पाहायचं नाही का?


उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, गिते यांनी पंचायत केली. त्यांनी सांगितले की, आता मी पुन्हा मुख्यमंत्री होईल म्हणजे मी पंतप्रधान म्हणून स्वप्न पाहायचं नाही का?  असो, मला असे स्वप्न पडत नाही. ना मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न पडले ना पंतप्रधान पदाचे. येथे सुद्धा गद्दारांची घराणेशाही आहे. रायगडमध्ये पवार साहेब मला आधी एका कार्यक्रमात बोलले होते की, या गद्दाराला गाडावं लागेल, असे ते म्हणाले. 


ही भाड्याने आणलेली जनता नाही


मोदी यांच्या थापा तुम्ही लोकांना सांगा, प्रचंड पैसा जाहिरातीवर खर्च केला आहे. जनसंवाद माझा नाही तुम्ही एकमेकात संवाद करा आणि जनतेसमोर सत्य येऊ द्या. सत्य जनतेसमोर आणण्याची जबाबदारी आता तुमची आहे, असे ते अनंत गीते यांना म्हणाले. ही भाड्याने आणलेली जनता नाही, असेही यावेळी उद्धव ठाकरे यांनी म्हटले. 


आणखी वाचा


Uddhav Thackeray : "अर्थसंकल्प म्हणजे टोपी घालण्याचा प्रकार", उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया