Nashik Lok Sabha Constituency : नाशिक लोकसभेसाठी 20 मे रोजी मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) नाशिकमध्ये जोरदार प्रचार केला जात आहे. सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे (Rajabhau Waje) यांनी शिवसेना ठाकरे गटाकडून (Shiv Sena UBT) उमेदवारी देण्यात आली आहे. कालच महाविकास आघाडीकडून जंगी शक्तीप्रदर्शन करत राजाभाऊ वाजेंचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. तर महायुतीत (Mahayuti) मात्र अजूनही नाशिकच्या जागेवर उमेदवार ठरलेला नाही. 


आता नाशिकच्या जागेवरून महायुतीत जोरदार हालचाली सुरु आहेत. भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन (Girish Mahajan) हे आज अचानक नाशिक दौऱ्यावर दाखल झाले आहेत. गिरीश महाजन यांनी भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांसोबत गुप्त बैठकदेखील घेतली आहे. 


उद्यापर्यंत नाशिकचा महायुतीचा उमदेवार जाहीर होण्याची शक्यता


आता मंत्री गिरीश महाजन यांच्या पाठोपाठ भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) हे आज सायंकाळी नाशिक दौऱ्यावर येणार आहेत.महायुतीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी चंद्रशेखर बावनकुळे घेणार आहेत. 2 मे रोजी दिंडोरीच्या जागेसाठी भारती पवारांचा (Bharti Pawar) अर्ज भरला जाणार आहे. त्याच दिवशी नाशिकचाही अर्ज भरला जावा,  यासाठी आता महायुती नेत्यांचे प्रयत्न सुरू असल्याचे दिसून येत आहे. उद्यापर्यंत नाशिकचा महायुतीचा उमेदवार जाहीर होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. 


गिरीश महाजन घेणार छगन भुजबळांची भेट


नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीतून माघार घेतलेले राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे नाराज असल्याची चर्चा सध्या रंगली आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री गिरीश महाजन हे आज छगन भुजबळांची भेट घेणार आहेत. छगन भुजबळ आणि गिरीश महाजन यांच्यात नेमकी काय चर्चा होणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.


इतर महत्वाच्या बातम्या 


मागे हटणार नाही! गिरीश महाजनांच्या भेटीनंतरही शांतीगिरी महाराज निवडणूक लढवण्यावर ठाम, महायुतीकडे केली मोठी मागणी


PM मोदींची पिंपळगावला जाहीर सभा होणार; छगन भुजबळांची माहिती, नाशिकच्या तिढ्याबाबतही केलं मोठं वक्तव्य!