Nashik Lok Sabha Constituency : नाशिकमधून महायुतीकडून (Mahayuti) निवडणूक लढण्यावर शांतीगिरी महाराज (Shantigiri Maharaj) अजूनही ठाम आहेत. आपण मागे हटणार नाही. आता माघार घेणार नाही. महायुतीकडून आपल्यालाच तिकीट मिळावे, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. 


भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी शांतीगिरी महाराजांची भेट घेतली. ओझरच्या आश्रमात महाराज आणि त्यांच्या भक्तांमध्ये बैठक झाली. शांतीगिरी महाराज यांनी कालच शिंदेंच्या शिवसेनेकडून (Shiv Sena Shinde Faction) उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. शांतीगिरी महाराजांना शिंदेंच्या शिवसेनेकडून एबी फॉर्मची प्रतीक्षा आहे. अचानक नाशिक दौऱ्यावर आलेल्या गिरीश महाजनांनी शांतीगिरी महाराजांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. शांतीगिरी महाराजांनी निवडणुकीतून माघार घ्यावी, असे मागणी गिरीश महाजन यांनी केल्याची माहिती मिळत आहे. 


महायुतीने आम्हाला तिकीट द्यावे - शांतीगिरी महाराज 


शांतीगिरी महाराज म्हणाले की, आमची कमिटी नेत्यांच्या भेटीगाठी घेत असतात.  आमच्या कमिटीत सर्वच पक्षांचे नेते आहेत. त्यामुळे जो भक्त ज्या पक्षाचा आहे, तो आपल्या नेत्यांशी चर्चा करत असतात. आमची मागणी आहे की, महायुतीने आम्हाला तिकीट द्यावे. ही आग्रही भूमिका आमच्या सर्व भक्त परिवाराने घेतली आहे, असे त्यांनी म्हटले आहे. 


नाशिकमधून नक्की कुणाला उमेदवारी?


दरम्यान, नाशिक लोकसभा मतदारसंघाचा (Nashik Lok Sabha Constituency) तिढा महायुतीत अद्याप कायम आहे. एकीकडे शिवसेनेचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) यांनी पुन्हा एकदा उमेदवारी मिळण्यासाठी वारंवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची भेट घेत नाशिकमधून उमेदवारीची मागणी केली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे देखील नाशिकमधून निवडणूक लढण्यास इच्छुक होते. मात्र त्यांनी अचानक निवडणुकीतून माघार घेतली. यानंतर शांतीगिरी महाराजांनी काल शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. यामुळे महायुतीत मोठी खळबळ उडाली. यानंतर भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन (Girish Mahajan) हे आज अचानक नाशिकमध्ये दाखल झाले. त्यांनी भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांसोबत गुप्त बैठक देखील घेतली. आता महायुतीतून नाशिकची जागा शिवसेना, राष्ट्रवादी की भाजप लढवणार? नाशिकमधून नक्की कुणाला उमदेवारी मिळणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या 


PM मोदींची पिंपळगावला जाहीर सभा होणार; छगन भुजबळांची माहिती, नाशिकच्या तिढ्याबाबतही केलं मोठं वक्तव्य!


Chhagan Bhujbal : 'मतदानाच्या दिवसापर्यंत तरी नाशिकच्या जागेवर उमेदवार जाहीर करा', भुजबळांचा महायुतीला खोचक टोला