Nashik Weather Update नाशिक :  नाशिक शहरासह (Nashik) जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून थंडीचे (Winter) प्रमाण वाढले आहे. शुक्रवारी नाशिकला (Nashik Weather Update) किमान 12.1 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले आहे. तर गुरुवारी नाशिकचे कमाल तापमान 27.9 अंश सेल्सिअस इतके होते. मंगळवारी (दि. 16) नाशिकमध्ये 9.8 किमान तापमानाची नोंद झाली होती. 


यामुळे नाशिककर चांगलेच गारठले आहेत. तर दुपारी कडक उन्हाचा देखील सामना नाशिककरांना करावा लागत आहे. दरवर्षी मकर संक्रांतीपासून (Makar Sankranti 2024) दिवस मोठा होत जातो आणि थंडीचे प्रमाण हळूहळू कमी होत जाते, असे म्हणतात. यंदा मात्र नाशिकमधील तापमानात अचानक घट झाली आहे. 


निफाडलाही हुडहुडी! 


निफाड तालुक्यातील (Niphad Taluka) कुंदेवाडी कृषी संशोधन केंद्रात शुक्रवारी किमान  9.2 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले आहे. तर गुरुवारी 29.4 कमाल तापमानाची नोंद करण्यात आली आहे. तर सोमवारी 6.5 अंश सेल्सिअसपर्यंत निफाडचा पारा घसरला होता. निफाडमधील यंदाचे हे निचांकी तापमान नोंदवले गेले. 


द्राक्ष बागायतदार धास्तावले


लासलगावसह (Lasalgaon) निफाड तालुक्यात थंडीची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे द्राक्ष उत्पादक धास्तावले आहेत. गेल्या पंधरवड्यापासून थंडीची चाहूल लागली होती, मात्र मधील काळात ढगाळ वातावरणामुळे थंडीच्या प्रमाणात काहीशी घट झाली होती. परंतु आता पुन्हा थंडी पुन्हा वाढली आहे. त्यामुळे द्राक्ष उत्पादकांमध्ये चिंतेचे वातावरण तयार झाले आहे.


द्राक्षमण्यांच्या फुगवणीवर परिणाम


हरभरा, गहू या पिकांना जरी या थंडीचा फायदा होत असला तरी मात्र या थंडीने फळबगांसह द्राक्षपिकांच्या वाढीवर याचा परिणाम होत आहे. त्याचप्रमाणे द्राक्षमण्यांच्या वाढीचा वेग मंदावतो तसेच मण्यांची फुगीरतेवर परिणाम होण्याची शक्यता असते. यामुळे द्राक्षघडांचे वजन कमी भरते. 


शेकोट्या पेटवत थंडीपासून संरक्षण


थंडीपासून संरक्षण करण्यासाठी नागरिक, शेतकरी, ऊसतोड कामगारांनी शेकोट्या पेटविल्या होत्या. थंडीमुळे रस्त्यांवर सकाळी वर्दळ कमी दिसून आली. तसेच नागरिकांनी उबदार कपडे परिधान केल्याचे पाहायला मिळाले.


नाशिकमध्ये धुक्याची दुलई 


नाशिक शहरासह जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पहाटे धुक्याची चादर पसरत आहे. यामुळे ढग जमिनीवर अवरतल्याची परिस्थिती निर्माण होत आहे. याचा आनंद व्यायामप्रेमी घेताना दिसून येत आहेत. मात्र पहाटेच्या सुमारास वाहनचालकांना वाहने चालवताना अडचणींचा सामना करावा लागत आहे.  


इतर महत्वाच्या बातम्या


नाशिक लोकसभा : हेमंत गोडसे हॅटट्रिक करणार? दिनकर पाटलांची जोरदार तयारी, समीर भुजबळांकडूनही दावा!


Nashik Leopard News : अखेर बिबट्या मादी अन् बछड्यांची झाली भेट, घटना कॅमेऱ्यात कैद