Nashik Crime News : नाशिकच्या बिल्डरकडून (Builder) शेजारी राहत असलेल्या ओळखीचा फायदा घेत 27 वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थ्यास (Student) प्राजेक्टमध्ये गुंतवणूक (Investment) करण्यास सांगून जादा परतावा देण्याचे अमिष दाखवत तब्बल 25 लाख रुपयांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात (Sarkarwada Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


याबाबत अथर्व अर्जुन देवरे(रा. रणजित रवी अपार्टमेंट, कॅनडा कॉर्नर, नाशिक) यांनी फिर्याद दाखल केली आहे. अथर्व हा शिक्षण घेत असताना त्याच्या सोसायटी शेजारील माणिक टॉवरमध्ये संशयित बिल्डर टाटीया व भागीदार दीपक धाकराव राहत राहत होते. शेजारी राहत असल्याने अथर्व आणि बिल्डरची ओळख झाली. 


25 लाख 70 हजार रुपये उकळले


याच ओळखीचा फायदा घेत टाटीया व धाकराव यांनी संगनमत करुन अथर्व यास ‘निर्मिती बिल्डटेक’ या बांधकाम व्यवसायाच्या गंगापूर परिसरातील मोतीवाला कॉलेजवळील सर्व्हे नंबर 122/13/1 यातील प्लॉट नं 18 आणि 19 मध्ये बांधण्यात येणाऱ्या ‘वृंदावन रो-बंगलो’ या प्रोजेक्टमध्ये 25 लाख 70 हजार रुपये गुंतवणुक करण्यास भाग पाडले. 


सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल 


या रक्कमे व्यतिरिक्त आर्थिक फायदा करुन देण्याचे आमिष दाखवून प्रस्तावित वृंदावन रो-बंगलोचा प्रोजेक्ट पूर्ण न करता या प्रोजेक्टमध्ये गुंतवणुक केलेले अथर्वचे पैसे परत न करता फसवणूक केली. याबाबत बिल्डर यशपाल अभय टाटीया आणि भागीदार दीपक बाळासाहेब धाकराव यांच्याविरोधात फसवणूक आणि अपहाराची गुन्हा सरकारवाडा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहे. 


आर्थिक कारणातून अपहरण करून एकास मारहाण


पैशाच्या देवाणघेवाणीतून एकाचे वाहनातून अपहरण करून त्याला मारहाण करून निर्जनस्थळी सोडून दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी योगेश पांडुरंग हिरे हे आपल्या घरी असताना आरोपी शंतनू जाधव हा त्याची कार घेऊन हिरे यांच्या घरी आला. त्यांना जबरदस्तीने गाडीत बसवून प्रथम नाशिकरोड येथे आरोपी शंतनू जाधव राहत्या घराच्या परिसरात व तेथून देवळाली, भगूरमार्गे वाडीवऱ्हे परिसरात निर्जन ठिकाणी नेऊन तेथे हिरे यांना पैशाच्या कारणावरून शिवीगाळ केली. त्यानंतर लाथाबुक्क्यांनी पोटावर, कानावर मारहाण करून धमकी दिली. तसेच त्यांना निर्जनस्थळी सोडून निघून गेला. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या 


FDA च्या धाडीत आरोग्याला धोकादायक असणारा 7 टन आंब्याचा साठा जप्त; विषारी आंबा चुकून खाल्लाच तर काय होईल?


Nashik Crime : घरगुती वाद, अनैतिक संबंधातून काढला पतीचा काटा, पत्नी-प्रियकरासह कुटुंबीयांनी रचला कट, नांदगाव हादरले