Ban On PoP Ganesh Idol : यंदा गणरायाचे (Ganesh Utsav 2022) आगमन उशिरा होणार असले तरीही गणरायाच्या आगमनाचे वेध लागले आहे. त्यामुळे आतापासून मनपा प्रशासन तयारीला लागले आहे. यंदा गणेशोत्सवासाठी मूर्ती विक्री करणाऱ्यांना स्टॉल लावण्यासाठी परवानगी देताना प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती (Plaster of Paris Idols) विक्री करणार नसल्याचे हमीपत्र सक्तीचे करण्यात आले आहे. नाशिक शहरात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या घालण्याचा निर्णय मनपाने घेतला आहे. 


यंदा अधिक मासासह श्रावणाचा महिना असल्याने गणेशोत्सव सप्टेंबर महिन्यात होत आहे. मात्र गणपती उत्सव नियोजन करण्यास सुरुवात झाली आहे. या संदर्भात नाशिक महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांच्या अध्यक्षतेखाली अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. उच्च न्यायालयाने नद्यांचे प्रदूषण टाळण्यासाठी पीओपीच्या मूर्तीवर विक्री आणि साठा करण्यास बंदी घातलेली असल्याने प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करण्याच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत. त्या अनुषंगाने बैठकीत चर्चा करण्यात आली. 


स्टॉल धारकांकडून पीओपीच्या गणेशमूर्ती विक्री न करण्याचं हमीपत्र घेणार


यंदा 19 सप्टेंबर रोजी गणेशोत्सवास प्रारंभ होणार असून, तत्पूर्वी गणेशमूर्ती (Ganesh Idol) विक्री करणाऱ्या स्टॉलधारकांनी महानगरपालिकेची परवानगी घ्यावी. ही परवानगी घेताना संबंधित स्टॉल धारकांकडून प्लास्टर ऑफ पॅरिसची गणेशमूर्ती विक्री न करण्याचे हमीपत्र घेतले जाणार आहे, तसेच डोंगरे वसतिगृह, ठक्कर डोम, गोल्फ क्लब मैदान येथे खासगी लोक मूर्ती विक्रीचे स्टॉल उभारतात. त्यांना देखील याबाबतची सूचना केली जाणार आहे. महापालिकेच्या बांधकाम आरोग्य विभागामार्फत गणेशोत्सव कालावधीत मूर्ती संकलन केले जाते. त्यानुसार यंदा आकर्षक कृत्रिम तलाव आणि अधिकाधिक गणेशमूर्ती संकलन करणाऱ्या निवडक पथक तसेच कर्मचाऱ्यांचा सत्कार महानगरपालिकेतर्फे करण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले.


कृत्रिम तलाव उभारले जाणार


दरम्यान गणेश विसर्जनासाठी नेहमीप्रमाणे शहरातील विविध भागात कृत्रिम तलाव उभारले जातील. गोदावरी नदी आणि इतर चार उपनद्यांमध्ये प्रदूषण निर्माण होणार नाही, याची दक्षता घेतली जाणार असून, त्यादृष्टीने शहरासह उपनगरांमध्ये कृत्रिम तलाव उभारले जाणार असल्याचे बैठकीत ठरले. विक्रेत्यांनी शाडूमातीच्या गणेशमूर्ती विक्रीसाठी उपलब्ध करुन द्याव्यात, तसेच भाविकांनी तसेच देखील शाडूच्याच मूर्ती घेण्यास प्राधान्य द्यावे. तसेच गणेशमूर्तींसाठी पर्यावरणपूरक रंगांचाच वापर करण्याचे आवाहन आयुक्त करंजकर यांनी केले आहे.


हेही वाचा


Ganesh Utsav 2022 : पीओपींच्या मूर्तीबाबत विविध पर्यायांवर चर्चा, सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची पालिकेसोबत बैठक