एक्स्प्लोर

Amey Khopkar on Nashik Tree Cutting: पार्थ पवारांना जसं माफ केलं तसं झाडांनाही माफ करा; तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे आक्रमक, अमेय खोपकर म्हणाले, साधू महंतांचे स्वागत, पण...

Amey Khopkar on Nashik Tree Cutting: तपोवनातील वृक्षतोडीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेकडून निषेध आंदोलन करण्यात आले.

Amey Khopkar on Nashik Tree Cutting: नाशिकमध्ये 2027 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या (Kumbh Mela 2027) तयारीला जोरदार सुरुवात झाली असली, तरी तपोवन (Tapovan) परिसरातील प्रस्तावित साधूग्राम (Sadhugram) प्रकल्पामुळे 1800 झाडांची तोड (Tree Cutting) होणार असल्याची माहिती समोर आल्यानंतर संतापाची लाट उसळली आहे. साधू-महंतांच्या तात्पुरत्या निवासासाठी 1150 एकरांवर साधूग्राम उभारण्याचे नियोजन असून, त्यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करावी लागणार आहे. या निर्णयाचा नागरिक, पर्यावरणप्रेमी, स्थानिक संघटना, सेलिब्रिटींसह राजकीय पक्षांनी जोरदार विरोध केला आहे. या पार्श्वभूमीवर आज शनिवारी (दि. 06)  महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेकडून तपोवनात निषेध आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर (Amey Khopkar), अभिनेते संतोष जुवेकर यांच्यासह अनेक कलाकार या आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी अमेय खोपकर यांनी पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणाचा धागा पकडत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधलाय. 

Amey Khopkar on Nashik Tree Cutting: तसं झाडांना देखील माफ करा

अमेय खोपकर म्हणाले की,  मला लाज वाटत आहे की, सरकारने झाडावर फुल्या मारल्या. हे आई-वडिलांवर फुल्या मारल्यासारखे आहेत. एकाही झाडाच्या फांदीला महाराष्ट्र नवनिर्माण सेना हात लावू देणार नाही. माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की, जसं पार्थ पवारला माफ केलंय, तसं झाडांना देखील माफ करा. झाडे तोडण्याचा प्रयत्न झाला तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना मोठे आंदोलन छेडेन. एकाही झाडाच्या फांदीला हात लागता कामा नये, असा इशारा अमेय खोपकर यांनी दिला.

Amey Khopkar on Nashik Tree Cutting: साधू महंतांचे स्वागत, पण...

अमेय खोपकर पुढे म्हणाले की, एकही झाड तोडू देणार नाही, गिरीश महाजन खोटे बोलत आहेत ते कुठेही गेले नाहीत. साधू महंतांचे स्वागत करतो. पण, उरावर बसून आम्ही कुंभमेळा होवू देणार नाही.  हा परिसरात रेसिडेन्शिअल झोन करणार आहेत. बिल्डरच्या घशात ही जागा टाकली जाणार आहे. आम्हाला यात काही राजकीय पोळी भाजायची गरज नाही. जिथे पंधरा हजार झाडे लावणार आहेत. त्या ठिकाणी कुंभमेळा भरवावा, असे देखील त्यांनी म्हटले.

Shiv Sena on Nashik Tree Cutting: तपोवन वृक्षतोडीविरोधात शिंदे गटही मैदानात

दरम्यान, सत्ताधारी पक्षातील उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनीदेखील स्पष्टपणे वृक्षतोडीला विरोध दर्शवला होता. आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने या विषयावर आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसून आले तपोवनातील वृक्ष तोडी विरोधात शुक्रवारी शिंदेंच्या शिवसेनेकडून आंदोलन करण्यात आले.

आणखी वाचा 

Nitesh Rane on Tapovan tree cutting: नितेश राणेंनी तपोवनातील वृक्षतोडीत कुर्बानीच्या बकऱ्यांना आणलं, ठाकरे गटाच्या नेत्याने अक्कल काढली, म्हणाला, 'टिल्लू लेव्हल बुद्धी....'

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Crime News: नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
Nashik Crime News: मैत्रीत दगाफटका; फिरायला गेले अन् मित्राने महिलेला कारनं चिरडलं, अपघाताचा बनाव रचला पण..., असं फुटलं बिंग, नाशिकमधील घटना
मैत्रीत दगाफटका; फिरायला गेले अन् मित्राने महिलेला कारनं चिरडलं, अपघाताचा बनाव रचला पण..., असं फुटलं बिंग, नाशिकमधील घटना
Nashik Ashram School : मुले फरशीवर झोपतात, तिथेच अभ्यास, रात्रीच्या अंधारात कपडे धुवावे लागतात; नाशिकच्या आश्रमशाळेची स्थिती, लाखोंचा निधी कुठे जातोय? 
मुले फरशीवर झोपतात, तिथेच अभ्यास, रात्रीच्या अंधारात कपडे धुवावे लागतात; नाशिकच्या आश्रमशाळेची स्थिती, लाखोंचा निधी कुठे जातोय? 
मुलीसोबत बोलताना व्हिडीओ काढल्याचा राग आला, डोक्यात कोयता घालून दुसऱ्या मजल्यावरुन ढकललं, नाशिकमधील धक्कादायक घटना
मुलीसोबत बोलताना व्हिडीओ काढल्याचा राग आला, डोक्यात कोयता घालून दुसऱ्या मजल्यावरुन ढकललं, नाशिकमधील धक्कादायक घटना

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Embed widget