नाशिक : लोकसभा निवडणुकीचे एक्झिट पोल (Lok Sabha election Exit Poll 2024) काल समोर आले आहेत. नाशिक लोकसभा मतदारसंघातून (Nashik Lok Sabha Constituency) शिवसेना ठाकरे गटाचे (Shiv Sena UBt) राजाभाऊ वाजे आघाडीवर आहेत. तर शिवसेना शिंदे गटाचे हेमंत गोडसे (Hemant Godse) हे पिछाडीवर आहेत, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर लोकसभा निवडणुकीसाठी 4 जूनला मतमोजणी पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये ठाकरे गटाकडून  मतमोजणीसाठी नेमणूक केलेल्या प्रतिनिधींना प्रशिक्षण देण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली. 


यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे नाशिक जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांनी प्रतिनिधींना विविध सूचना केल्या. ते म्हणाले की,  नाशिक लोकसभा मतदारसंघात एकूण 1 हजार 910 बूथ आहेत. बॅलेट युनिट आणि कंट्रोलिंग युनिट महत्वाचे आहे.  सर्व बूथची आम्ही माहिती गोळा केली आहे आणि तिथे किती मतदान झाले. ही आकडेवारी आमच्याकडे आहे. बूथ प्रतिनिधींनी सर्व काउंटिंग नंबर चेक करून मतदान मोजणी सुरू करावी. बॅलेट आणि कंट्रोलिंग युनिटचा स्टार्टिंग टाईम आणि मतदान मोजणी बंद झाले त्यावर लक्ष ठेवावे.  बॅटरी किती चार्जिंग आहे त्यावर देखील लक्ष ठेवायचे आहे. रिझल्टचा टाइमिंग देखील तेथे बघून निर्णय घ्यायचा आणि नंतर मतमोजणी सुरू करायची, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. 


चार जूनची प्रतीक्षा करा, घोडा मैदान लांब नाही : सुधाकर बडगुजर 


यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना सुधाकर बडगुजर म्हणाले की, मतमोजणी प्रक्रिया ही पारदर्शक झाली पाहिजे. निवडणूक आयोग आणि लोकप्रतिनिधींकडून चुकीचे काम झाले नाही पाहिजे त्यासाठी आज बैठक घेतली आहे. पारदर्शकतेपणा मतमोजणीत असायला पाहिजे अशी आमची मागणी आहे.  काही ठिकाणी ईव्हीएमची बॅटरी बदलली जाते, काही ठिकाणी रिझल्ट बदलले जातात त्यावर आमचे लक्ष असणार आहे. बूथनिहाय लिस्ट आहे त्यावरून आकडे आणि मशीन मधील आकडे एकत्रित करूनच मतमोजणी सुरू करावी, अशा सूचना दिल्या आहेत. चार जूनला निकालाची प्रतीक्षा करा, घोडा मैदान लांब नाही, असे त्यांनी म्हटले. 


इतर महत्वाच्या बातम्या 


North Maharashtra Exit Poll Result 2024 : नाशिक, नगरसह उत्तर महाराष्ट्रात कोण मारणार बाजी? एक्झिट पोलचा अंदाज काय सांगतो?


नाशिक शिक्षक मतदारसंघात नवा ट्विस्ट, काँग्रेस नेते संदीप गुळवेंचा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश, लगेच उमेदवारीही घोषित