नाशिक: घरी गणेशाला विराजमान केल्यावर रशियाकडे गेलेल्या वैद्यकीय शाखेतील विद्यार्थ्याचा कझाकिस्तान येथे रस्ते अपघातात मृत्यू झाला. अभिषेक युवराज जाधव (रा. इंदिरा गांधी पुतळ्याजवळ, जेलरोड, नाशिक रोड) असे मृत मुलाचे नाव असून तो 22 वर्षांचा होता. अभिषेक हा रशियात एमबीबीएसच्या विद्याशाखेत तिसऱ्या वर्षात शिकत होता. 


अभिषेक हा गणेशोत्सवासाठी नाशिकला आई वडिलांकडे नाशिकला आला होता. मंगळवारी पहाटे तो विमानाने रशियाला गेला. तेथे पोहोचल्यानंतर अभिषेक आणि त्याचे चार मित्र कारने इच्छितस्थळी जात होते. त्यावेळी रस्त्याच्या बाजूला मोठ्या इमारतीचे बांधकाम सुरु होते. तेथील ट्रकला अडथळा आला आणि तो ट्रक अचानक रस्त्यावर आला. त्यामुळे अभिषेकची कार त्या ट्रकवर जाऊन आदळली.


अभिषेक कारमध्ये चालकाच्या बाजूकडील सीटवर बसला होता. त्यामुळे 22 वर्षीय अभिषेक जागीच ठार झाला व अन्य मित्र जखमी झाले. अभिषेकच्या मागे लहान बहीण आहे. त्याचे वडील नाशिक महानगरपालिकेत रुजू आहेत. अभिषेकचा मृतदेह गुरुवारी रात्री उशिरा नाशिकला आणण्यात येणार आहे.


ही बातमी वाचा: