Nashik News : शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्याच्या (Shivsena Thackery Group leader) दुकानात आठ किलो गांजा (cannabis) सापडल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शिवसेनेच्या नांदगाव तालुका प्रमुखाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अंमली पदार्थ बाळगल्या प्रकरणी नांदगाव पोलिसात (Nandgaon Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनमाड येथील उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. 


राजकीय दबावापोटी गुन्हा दाखल केल्याचा ठाकरे गटाचा आरोप


दरम्यान, तालुकाप्रमुखावर राजकीय दबावापोटी गुन्हा दाखल केल्याचा शिवसेना ( ठाकरे गट ) जिल्हाप्रमुखांनी आरोप केला आहे. दरम्यान, या कारवाईचा ठाकरे गटानं निषेध केला आहे. याप्रकरणी उबाठाच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना निवेदन दिले आहे. शिवसेना नेत्यावर खोटी कारवाई केल्याच्या निषेधार्थ आज नांदगाव, मनमाड शहर बंद राहणार आहे. 


महत्वाच्या बातम्या:


मोठी बातमी : पुण्यातील ड्रग्ज प्रकरणी मोठी कारवाई, उत्पादन शुल्क विभागाचे पोलीस निरीक्षक बोबडे निलंबित