शेतकऱ्यांनी नाफेडच्या तूर खरेदी केंद्राबाहेर रांगा लावल्या आहेत. लाखो क्विंटल तूर खरेदीविना पडून आहे. सरकारी केंद्रांवर तूर खरेदीची 22 एप्रिल ही अंतिम तारीख होती. त्यामुळे त्यानंतर तूर खरेदी थांबवण्यात आली. ज्या शेतकऱ्यांनी 22 एप्रिलपर्यंत किंवा त्यापूर्वी नोंदणी केली होती, त्याची तूर खरेदी केली जाईल, असा निर्णय सरकारने काल घेतला होता.
सरकारच्या या निर्णयाला 24 तासांपेक्षाही अधिक काळ उलटून गेला आहे. वैतागून काही शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांना कवडीमोल भावाने तूर खरेदी केली आहे. सरकारकडून 5 हजार 50 रुपये हमीभावाने तूर खरेदी केली जाते. तर व्यापाऱ्यांकडून 4 हजार रुपये भाव देण्यात आला आहे.
तूर खरेदीला आणि पैसे मिळायला दोन महिने उलटणार?
फक्त 22 एप्रिलपर्यंतच नोंदणी झालेल्या तूर खरेदीची सरकारने घोषणा केली खरी, पण 22 एप्रिलपर्यंतची तूर खरेदी करायचं ठरलं तरी बराच वेळ लागण्याची शक्यता आहे.
कारण नाफेडने संपूर्ण यंत्रणा कामाला लागली तरी, नोंदणी झालेली तूर खरेदी करण्यासाठी महिना उलटण्याची शक्यता आहे. तूर खरेदीनंतर शेतकऱ्यांच्या हातात पैसे पडायला किमान दोन महिने लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या घोषणेनंतरही तूर खोळंबा कायम राहण्याची शक्यता आहे.
संबंधित बातम्या :