Soyabean Price News : सध्या राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी (Soyabean Farmers) चिंतेत आहेत. कारण सोयाबीनच्या दरात कमीलीची घसरण झाली आहे. नंदूरबार (Nandurbar) जिल्ह्यात आठवडाभरात सोयाबीनच्या दरात 900 रुपयांची घसरण झाली आहे. सध्या सोयाबीनला प्रति क्विंटलला 4 हजार 600 रुपयांचा दर मिळत आहे. दर घसरल्यामुळं  शेतकऱ्यांनी नाराज व्यक्त केली आहे. शेतकरी दरवाढीची अपेक्षा करत आहेत. सोयाबीनच्या दरांमध्ये सातत्यानं चढ उतार होत असल्याने शेतकरी संभ्रमात पडले आहेत. 


मागील आठवड्यात सोयाबीनला 5 हजार 474 रुपयांचा दर 


खरीप हंगामात नंदूरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर सोयाबीनची पेरणी केली जात असते. यंदाही मोठ्या प्रमाणावर सोयाबीनची लागवड करण्यात आली होती. बहुतांश ठिकाणी शेतकऱ्यांनी सोयाबीनची काढली केली आहे. हे काढलेलं सोयाबीन आता विक्रीसाठी नंदुरबार बाजार समितीत दाखल होत  आहे. मात्र, सध्या सोयाबीनच्या दरांमध्ये चढ उतार होत असल्याने शेतकरी संभ्रमात सापडले आहेत. नंदूरबार बाजार समिती मागील आठवड्यात सोयाबीनला प्रती क्विंटल 5 हजार 474 रुपयांचा दर होता. तर या आठवड्यात सोयाबीनच्या दरात घसरण झाली आहे. सध्या सोयाबीनला प्रति क्विंटलला 4 हजार 600 रुपयांचा दर मिळत आहे. दरामध्ये जवळपास 900 रुपयांची घसरण झाली आहे.




बाजर समितीत सोयाबीनची आवक कमी


अचानक सोयाबीनच्या दरात 900 रुपयांची घसरण झाल्यानं नंदूरबार समितीत सोयाबीनची आवक कमी झाली आहे. सोयाबीनला जोपर्यंत चांगला दर मिळत नाही तोपर्यंत शेतकरी सोयाबीन बाजारात विक्रीसाठी आणणार नसल्याच्या चित्र सध्या दिसत आहे. नंदूरबार जिल्ह्यात 25 हजार 326 हेक्टरवर  सोयाबीन पिकाची पेरणी झाली होती. सध्या सोयाबीनला कमी दर मिळत असल्यानं शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. दर घसल्यामुळं शेतकरी सोयाबीन विक्रीकडं पाठ फिरवत असल्याचे चित्र दिसत आहे.


अतिवृष्टीचा शेतकऱ्यांच्या पिकांना मोठा फटका


यावर्षी राज्याच्या बहुतांश भागात जोरदार पाऊस झाला. अनेक जिल्ह्यात अतिवृष्टीनं थैमान घातलं होतं. याच शेतकऱ्यांच्या पिकांना मोठा फटका बसला आहे. शेतकऱ्यांची हातात आलेली उभी पीकं वाया गेली आहेत. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत. अतिवृष्टीचा सर्वात मोठा फटका मराठवाडा आणि विदर्भाला बसला आहे. काही ठिकाणी पीक वाया गेली आहेत, तर काही ठिकाणी  जमिनीही खरवडून गेल्या आहेत. दुसरीकडं अतिवृष्टीच्या तडाख्यातून वाचलेल्या पिकांवर रोगराईचा परिणाम झाला आहे. त्यामुळं उत्पादनात मोठी घट आली आहे. अशातच बँकांकडून शेतकऱ्यांनी कर्ज काढलं आहे. आता हे कर्ज कसं फेडायचं असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. त्यामुळं शेतकरी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलत आहेत.


महत्त्वाच्या बातम्या:


Nanded Rain : नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीनं दीड लाख हेक्टरवरील सोयाबीन पाण्यात, कर्ज काढून रब्बीची पेरणी करण्याची वेळ