Nandurbar Agriculture News : शेती करताना शेतकऱ्यांना (Farmers) विविध समस्यांचा सामना करावा लागतो. कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकट येतात. मात्र, या संकटांवर मात करुनही काही शेतकरी शेतात नवीन प्रयोग करुन भरघोस उत्पादन घेत आहेत. शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला तर शेतीतूनही चांगल्या प्रकारे उत्पादन घेता येऊ शकतं हे नंदूरबार (Nandurbar) जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील सुलतानपूर येथील एका शेतकऱ्यानं दाखवून दिलं आहे. राजेंद्र पवार असं शेतकऱ्याचे नाव असून, त्यांनी पारंपरिक पिकांना फाटा देत आल्याची शेती (Ginger cultivation) केली आहे. या शेतीतून त्यांनी शाश्वत उत्पादन मिळवले आहे. पावणे दोन एकरात त्यांना आल्याचे 15 ते 16 टन उत्पादन अपेक्षीत आहे.
राजेंद्र पवार यांच्याकडे 14 एकर जमीन आहे. यापैकी त्यांची काही जमीन गावाजवळ आहे. गावाजवळ असलेल्या जमिनीत पाळीव प्राणी आणि इतर कारणांनी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असे. त्यामुळं त्यांनी या पावणे दोन एकर जमिनीत काही नवीन प्रयोग करण्याचे ठरवले. राजेंद्र पवार यांनी बाजारपेठेचा अंदाज घेऊन आल्याची शेती करण्याचे नियोजन केले. यासाठी त्यांनी नाशिकमधून 20 रुपये किलोने दरानं आल्याचे बेणे खरेदी केले. या आल्याच्या शेतीमधून त्यांनी भरघोस उत्पादन घेतलं आहे. पावणे दोन एकरात त्यांनी आल्याचे 16 टन उत्पादन अपेक्षीत हे. या आल्याला मध्य प्रदेशमधील व्यापारी जागेवरच किलोला चाळीस रुपयांचा दर देत आहेत.
10 लाख रुपयांचे उत्पन्न अपेक्षीत
आतापर्यंत पावणे दोन एकर आल्याच्या शेतीत दोन लाख रुपयांचा खर्च झाला आहे. यामधून दहा लाख रुपयार्यंतच्या उत्पादनाचा अंदाज असल्याची माहिती शेतकरी राजेंद्र पवार यांनी दिली. खर्च वजा जाता आठ लाख रुपये निवव्व नफा राहणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
मध्य प्रदेशच्या व्यापाऱ्याला आल्याची विक्री
माझ्याकडे 14 एकर शेती असून यामध्ये केळी, पपई, टरबूज, हरभरा आहे. यावर्षी मी आल्याची लागवड केल्याची माहिती शेतकरी राजेंद्र पवार यांनी दिली. आल्याच्या लावडीतून मला चांगला फायदा होत आहे. पावणे दोन एकरमधून मला 15 ते 16 टन माल निघण्याची अपेक्षा आहे. या मालाची मी मध्य प्रदेशच्या व्यापाऱ्याला 40 रुपये किलो दरानं विक्री करणार असल्याचे पवार यांनी सांगितेल.
महत्त्वाच्या बातम्या:
Cleaning Tips : साफसफाईसाठी आल्याचा 'असा' करा वापर; वाचा संपूर्ण माहिती