नंदुरबार: राज्यामध्ये आठवडाभरापासून (Unseasonal Rain) वादळ वारे, अवकाळी पाऊस आणि गारपिटीने थैमान घातलंय. हजारो हेक्टरवरील शेती पिकं अक्षरशः उद्ध्वस्त झाली आहे.  नंदुरबारमध्ये (Nandurbar News)  पिकांना मोठा फटका बसला आहे. रब्बी हंगामातील हरभरा गहू आणि  इतर पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता वर्तवली जातेय. नंदुरबारसारख्या आदिवासी भागात अवकाळीचा मारा सुरूच आहे. शेतकरी हवालदिल झालाय अजूनही काही शेतकऱ्यांना पंचनामे होण्याची प्रतीक्षा आहे. 


 नंदुरबार जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कापूस मिरची, भात तसेच केळी, पपई आणि रब्बी हंगामातील ज्वारी, हरभरा, गहू पिकांचा समावेश आहे. मात्र पंचनामे करत असताना फक्त केळी पपई आणि रब्बी ज्वारीचे पंचनामे होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहेय  इतर नुकसानाकडे दुर्लक्ष होत असल्याने त्या नुकसानाची नुकसान भरपाई कोण देणार असा प्रश्न शेतकऱ्यांनी केला आहे.  त्यामुळे सरकारने भेदभाव न करता सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी अपेक्षा नंदुरबार जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी व्यक्त केली.


कापूस वेचणीला असताना अवकाळीचा फटका


 सरकार कापूस दराच्या संदर्भात भूमिका घेत नाही अवकाळी पावसामुळे कापसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले दुष्काळी परिस्थितीत जगवलेला कापूस ऐन वेचणीला असताना अवकाळीने खराब केला आहे.  त्यामुळे व्यापारी ही भाव देत नाही आणि सरकार कापसाचे पंचनामे करत नसेल तर आम्ही जगावे कसे असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. नुकसानीचे पंचनामे करत असतानाही भेदभाव होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. सरसकट पंचनामे न करता फक्त केळी पपई आणि रब्बी ज्वारी पिकाच्या नुकसानीचे पंचनामे होत असल्याने लहान अल्पभूधारक शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसत असल्याचे चित्र दिसून येत आहे


शेतकऱ्यांचा अश्रूंचा बांध फुटला


अहमदनगरच्या पारनेर तालुक्यात तर वादळी वाऱ्यासह आलेल्या गारपिटीने शेतकऱ्यांची उभी पिकं जमीनदोस्त झालीये. शेतकऱ्यांच्या डोळ्यात अक्षरशः पाणी दाटलं आहे. जेवढा मोठा बागायतदार तेवढं मोठं नुकसान अशीच काहीशी परिस्थिती झाली आहे. पारनेरच्या वडुले गावच्या पठारे कुटुंबाची.पारनेर तालुक्यात झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पारनेर तालुक्यात आले आणि या शेतकऱ्यांचा अश्रूंचा बांध फुटला. पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी या नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.


हे ही वाचा :


कोणत्याही जातीचा शेतकरी असो, पंचनामे करतांना भेदभाव करू नका; अब्दुल सत्तारांच्या अधिकाऱ्यांना सूचना