नंदुरबार : राज्यातील सर्वात मोठा मिरची (Chilli)  उत्पादक जिल्हा म्हणून नंदुरबार (Nandurbar News) जिल्ह्याची ओळख आहे.  नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समिती मिरचीच्या खरेदी विक्रीसाठी देशातील दुसऱ्या क्रमांकाची बाजार समिती असून नंदुरबार बाजार समितीमध्ये दररोज 300 ते 400 वाहनातून तीन ते चार हजार क्विंटल मिरची विक्रीसाठी दाखल होत आहे.  मिरचीची मोठ्या प्रमाणात आवक होत आहेत. मात्र यावर्षी मिरचीची आवक जास्त असली तरी मिरचीचे दर कायम आहेत.


 नंदुरबार बाजार समितीत ओल्या लाल मिरचीला प्रतवारीनुसार तीन हजार ते साडेसहा हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे. मिरचीचे आवक वाढल्यानंतर दर कायम असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान आहे. नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीत आतापर्यंत व्यापाऱ्यांनी 90 हजार क्विंटल मिरचीची खरेदी केली असून अजून हंगाम पाच महिने सुरू राहणार आहे. त्यामुळे यावर्षी नंदुरबार बाजार समितीत मिरची खरेदी विक्रीची विक्रमी उलाढाल होणार आहे. नंदुरबार जिल्ह्याप्रमाणे शेजारील गुजरात आणि मध्य प्रदेश राज्यातूनही मोठ्या प्रमाणात मिळतील. नंदुरबार बाजार समितीत विक्रीसाठी दाखल होत आहे. बाजार समितीत 25 ते 26 व्यापाऱ्यांकडून या मिरचीची खरेदी होत असून योग्य दर दिला जात आहे. यावर्षी जिल्ह्यात मिरचीचे विक्रमी उत्पादन होण्याचा अंदाज बाजार समितीचे सचिव योगेश अमृतकर यांनी व्यक्त केला आहे.


Maharashtra Nandurbar News : देशातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी बाजारपेठ


यावर्षी मिरचीसाठी असलेले पोषक वातावरण आणि मिरचीला मिळणारा चांगला दर या दोन्ही गोष्टी शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरल्या आहेत. त्यामुळं यावर्षी जिल्ह्यातील मिरचीच्या उत्पादन क्षेत्रात वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. आंध्र प्रदेशातील गुंटूरनंतर देशातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी बाजारपेठ म्हणून नंदुरबार जिल्ह्याची ओळख आहे. नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मिरचीची उत्पादन घेतले जात असले तरी राज्य सरकारकडून मिरची प्रक्रिया उद्योग आणि मिरची संशोधन केंद्र अजूनही सुरू करण्यात आलं नाही.त्यामुळं मिरची उत्पादक शेतकऱ्यांसमोरील अनेक अडचणी अजून सुटल्या नाहीत. मिरची उत्पादक शेतकऱ्यांसाठी सरकारनं योग्य धोरण आखावं अशी मागणी शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांकडून होत आहे.


Maharashtra Nandurbar News : मिरचीला तीन ते साडेतीन हजारापर्यंत भाव 


मिरचीचे भाव मागील वर्षापेक्षा दुपटीने वाढले असून त्यामुळं सर्वसामान्यांच्या जेवणातील महत्त्वाच्या घटक असलेला चटणीचे दरही वाढले आहेत.  मागील हंगामातील एकूण आवक ही दोन लाख पाच हजार क्विंटल झाली होती. या हंगामात मार्चअखेर ही आवक दोन लाख 17 हजार क्विंटल झाली आहे. गेल्या वर्षी मिरचीला 2500 रुपये क्विंटल पर्यंतचा दर होता. यावर्षी मिरचीच्या दरात  वाढ झाली असून सरासरी मिरचीला तीन ते साडेतीन हजारापर्यंत भाव मिळत आहे. दर वाढल्यामुळं शेतकऱ्यांना चांगला फायदा होत आहे. मिरचीचे दर वाढल्यानं चटणीच्या दरातही दुप्पट वाढ झाली आहे.


हे ही वाचा :


Buldhana News: बळीराजा पुन्हा संकटात; राज्यातील 6 लाख हेक्टरवरील तूरीचं पीक धोक्यात, बदलत्या वातावरणामुळे रोगाचा प्रादुर्भाव