नंदुरबार:  आजच्या काळात परंपरागत शेती शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या परवडणारी नाही त्यामुळे शेती क्षेत्रात येणाऱ्या शिक्षित तरुणांकडून नवनवीन आधुनिक प्रयोग केले जात आहेत.  तरूणांनी केलेल्या या प्रयोगांना यशही मिळत असल्याचे चित्र आहे. असाच प्रयोग नंदुरबारसारख्या (Nandurbar News) आदिवासी दुर्गम जिल्ह्यातील मध्यप्रदेश आणि महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या खेड दिगर या छोट्या खेड्यातील हर्ष पाटील या तरुणाने केला आहे.  आपल्या शिक्षणाचा उपयोग करत नवीन तंत्रज्ञान आत्मसात करत काश्मीरमध्ये लावले जाणारे केशरचे उत्पन्न  घेतले. घरालगत असलेल्या 15 बाय 15 च्या खोलीत केशर उत्पादनासाठी लागणारी थंड वातावरण वातालानुकुलीत खोली तयार केली.  दोन अडीच महिन्यात केशर उत्पादनाचा (Saffron)  प्रयोग  हर्ष मनिष पाटील याने  यशस्वी केला आहे.  राज्यातील हा पहिला प्रयोग असल्याचे सांगितले जात आहे.  


केशरची फुल (Kesar Flower पाहिल्यावर आपल्याला काश्मीरमध्ये असल्यासारख वाटेल. मात्र मात्र ही शेती  सातपुडा पर्वतरांगेच्या लगत मध्य प्रदेश राज्याच्या सीमेला असलेला शहादा तालुक्यातील खेडदिगर गावात  केली जात आहे.  700  ते 800  लोक संख्या वस्तीचा गावात  नवीन तंत्रज्ञान आत्मसात केले.  हर्ष मनिष पाटील कॉम्प्युटर सायन्सचे पदवीपर्यंत शिक्षण घेतले आहे. काश्मीर या ठिकाणी केशरचे मोठ्या प्रमाणावर उत्पन्न होत असते, याबाबत या युवकाने तेथील  तंत्रज्ञानाची इंटरनेटद्वारे  माहिती घेत त्याने केशर उत्पन्न घेण्याच्या मानस ठरवला


300 ग्रॅमपर्यंत उत्पादनाची शक्यता


काश्मीर येथील मोगरा जातीचा केशरच्या फ्लोअर कंद लावून केशर शेती सुरू केली. काश्मीरमधील श्रीनगर लगत असलेल्या पाम्पोर  येथून एक हजार रुपये किलो किमतीने मोगरा जातीचा कंद आणून घरालगत असलेल्या 15 बाय 15 च्या रूममध्ये त्याची सुरुवात केली.  या रूमला पूर्ण थर्माकोलने चिटकवून ती रूम वातानुकुलीत खोली बनवली. ही खोली 24 तास थंड  असते. एक सिड कंद लावल्यानंतर तीन महिन्यात त्यातून तीन-चार केशर निघते. एका सिड कंदचे आठ ते दहा वर्षे पर्यंत उत्पन्न मिळते. हळूहळू एका सिडचे चार सिड तयार होते.अडीच ते तीन महिने लागवड करून झाले आहे. साधारण पाच लाख रुपयांचा खर्च आला आहे. सिडला फुल बहारत आहे एका फुल मध्ये तीन केशर बाहेर निघत आहे. केशरचे उत्पादन सुरू झाले आहेत. 300 ग्रॅमपर्यंत उत्पादनाची शक्यता आहे. बाजारात एक ग्रॅम केशरचा भाव पाचशे रूपये असल्याचे हर्ष पाटील यांनी सांगितले. 


अडीच महिन्यानंतर केशरचे उत्पन्न


शेती हा आमच्या पारंपारिक व्यवसाय आहे.  शेती करताना कुटुंबाला अनेक अडचणींना समोर जावे द्यावे लागते. नैसर्गिक आणि इतर संकटाचा सामना करत असताना उत्पादनात प्रचंड घटत असते. त्यामुळे शेतीतून शाश्वत उत्पादनाचा मार्ग शोधण्यासाठी  केशरचे उत्पन्न घेण्याच्या निर्णय घेतला. काश्मीर येथील टेक्निशियन टेक्नॉलॉजी यांच्याकडूनं माहिती घेत त्यांनी घरालागत असलेल्या एका रूममध्ये केशरच सीड कंद घेऊन रोप लावलेले आहेत. अडीच महिन्यानंतर केशरचे उत्पन्न लागलेले आहे. पहिल्या वर्षी मोठ्या प्रमाणावर खर्च झाला असला तरी दुसऱ्या तिसऱ्या वर्षी याच्या मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळणार आहे.


नवीन तंत्रज्ञानाची साथ घेतल्यास शेतीही फायदेशीर


शेतीत नवनवीन प्रयोग करून आणि नवीन तंत्रज्ञानाची साथ घेतल्यास शेतीही फायदेशीर ठरू शकते.  बाजारपेठेत मागणी असलेल्या वस्तूंचे उत्पादन घेतल्यास शेतीतूनही लाखोंचा नफा कमवता येतो हे हर्ष या ग्रामीण भागातील आयटी इंजिनिअरने  सिद्ध करून दाखवले.


हे ही वाचा :


Saffron Water Benefits : सकाळी चहाऐवजी केशरचं पाणी प्या; आरोग्याला मिळतील अनेक आश्चर्यकारक फायदे