Saffron Water Benefits : आपल्यापैकी अनेकांच्या दिवसाची सुरुवात चहाने (Tea) किंवा कॉफीने (Coffee) होते. अनेकांचा तर घोटभर चहा घेतल्याशिवाय दिवसच पुढे सरकत नाही. मात्र, चहा, कॉफीमुळे शरीराला होणारे नुकसान आपल्या सगळ्यांनाच माहित आहेत. अशा वेळी तुम्हाला तुमच्या दिवसाची सुरुवात फ्रेश आणि आरोग्यदायी करायची असेल तर केशरचं पाणी हा तुमच्यासाठी अत्यंत रामबाण उपाय आहे. केशरमध्ये अनेक पोषक तत्त्व आढळतात. केशरच्या पाण्याचा आरोग्यासाठी कसा उपयोग होतो हे समजून घ्या.   


केशरचा समावेश मसाल्याच्या पदार्थांमध्ये केला जातो. तर, काही जण केशरला गोडाच्या पदार्थांत वापरतात. यामुळे पदार्थाला छान चव येते. परंतु, तुम्हाल माहित आहे का केशरमध्ये अनेक औषधी गुणधर्म देखील आहेत. सकाळी चहाऐवजी केशरचं पाणी प्यायल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात.    


केशरचं पाणी पिण्याचे फायदे 


1. कॉफीपेक्षाही गुणकारी : कॉफीमध्ये कॅफीनचा वापर केला जातो. जो आपल्या शरीरासाठी घातक आहे. अशा वेळी केशरचं पाणी प्यायल्याने तुम्ही निरोगीही राहाल आणि कॉफीइतकाच हे पाणी पिऊन तुमचा दिवसही उत्साही राहील. 


2. निरोगी त्वचेसाठी उपयुक्त : तुम्ही जर रोज केशरचं पाणी प्यायलात तर तुमची स्किनही तजेलदार तसेच निरोगी राहील. कारण या पाण्यात कोणतंच केमिकलयुक्त पदार्थांचा समावेश नाही. 


3. निरोगी केसांच्या वाढीसाठी उपयुक्त : नियमित केशरचं पाणी प्यायल्यास काही दिवसांतच तुम्हाला तुमच्या केसांत बदल जाणवेल. तुमचे केस अधिक घनदाट होतील. 


4. नियमित मासिक पाळी : जर तुमच्या मासिक पाळीचा कालावधी कमी असेल आणि या दरम्यान पोटात वेदना होत असतील तर केशरचे पाणी प्यायल्याने वेदना कमी होण्यास आणि प्रवाह संतुलित करण्यास मदत होऊ शकते.


5. बुद्धीचा विकास होण्यासाठी :


बुद्धीचा विकास होण्यासाठी केशर खूप महत्त्वाचे ठरते. बुद्धीचा विकास होण्यासाठी केशरमध्ये आवश्यक तेथे सर्व गुणधर्म आढळतात त्यामुळे लहान मुलांना केशर खायला दिल्यास त्यांच्या बुद्धीचा विकास होईल.


6. ताण तणाव कमी करण्यासाठी :


केसर ताणतणाव कमी करून बुद्धीचे आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी खूप फायद्याचे ठरते. त्यामुळे जर तुम्हाला ताण-तणाव आल्यासारखे वाटत असेल तर दुधामध्ये केशरचे काही तंतू घालून ते दूध पिल्यास ताण-तणाव कमी होऊन फ्रेश वाटते.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


महत्त्वाच्या बातम्या :


Health Tips : सावधान! हा 'धोकादायक' आजार मधुमेहाच्या रुग्णांची दृष्टी हिरावून घेऊ शकतो; काळजी घ्या