PM Narendra Modi : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी  प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील, असे वक्तव्य केले होते. शरद पवारांच्या वक्तव्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चांगलाच समाचार घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना मोठी ऑफर दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज महायुतीच्या उमेदवार हिना गावित यांच्या प्रचारासाठी नंदुरबारमध्ये जाहीर सभा पार पडली. यावेळी ते बोलत होते.


पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की,  गेल्या 40 ते 50 वर्षांपासून महाराष्ट्राचे एक दिग्गज नेते राजकारणात सक्रीय आहेत. ते सध्या काहीही बोलत आहेत. बारामतीच्या निवडणुकीनंतर ते चिंतेत गेले असून त्यांनी अनेक लोकांसोबत विचार करुन असं वक्तव्य केले असावे असं मला वाटतं. चार जूननंतर सार्वजनिक आणि राजकीय जीवनामध्ये टिकून राहायचं असेल तर छोट्या-छोट्या पक्षांना काँग्रेसमध्ये विलीन व्हावं लागेल असं त्यांना वाटत आहे. 


पंतप्रधान मोदींची ठाकरे, पवारांना मोठी ऑफर


याचा अर्थ नकली शिवसेना आणि नकली राष्ट्रवादीने काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा निर्णय घेणार आहेत. त्यामुळे त्यांनी काँग्रेसमध्ये विलीन होण्यापेक्षा शरद पवारांनी अजित पवारांसोबत यावे आणि उद्धव ठाकरेंनी शिंदेंसोबत यावे, अशी ऑफर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना दिली आहे. आता यावर ठाकरे आणि पवार यांच्याकडून काय प्रत्युत्तर येणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


मी मंदिरात जाणे देशद्रोह आहे का?


राम मंदिर भारतीय विचारांच्या विरोधात असल्याचे काँग्रेस सांगता आहे. मी मंदिरात जाणे देशद्रोह आहे का? हे भारत विरोधी कामं आहे का? काँग्रेसची मानसिकता, राम मंदिराला देश विरोधी दाखवत आतंकीच्या कबरीला सजावणारे लोक हे आहेत. राम मंदिराला जाण्याला देश विरोधी दाखवत आहेत, अशी टीका त्यांनी यावेळी काँग्रेसवर केली आहे. 


नकली शिवसेना मला जिवंत गाडण्याची भाषा करतंय


हिंदू आस्था मिटवण्याचे कामं काँग्रेस करीत आहे. देशाच्या अस्तित्वाचा आधार राम आहे. जे लोक देशा सोडून गेले आहेत, त्यांना रामाने सांगितल्याप्रमाणे, मातृभूमी ही स्वर्गाहून सुंदर आहे. सत्तेत आल्यावर काँग्रेस गरिबांना सतावले. गरीब विरोधी मानसिकतावाल्या मंडळींना माझ्यासारखं पंतप्रधान चालत नाही.  नकली शिवसेना मला जिवंत गाडण्याची भाषा करीत आहेत.मला शिव्या देतांना, वोट बँकेला आवडेल अशी भाषा वापरतात, अशी टीका त्यांनी यावेळी केली आहे. 


 


इतर महत्वाच्या बातम्या 


महाआरक्षणाचं महायज्ञ करतोय, मी जिवंत असेपर्यंत आरक्षणाला धक्का लावू देणार नाही; PM मोदींची काँग्रेसवर जोरदार टीका