Nandurbar Agriculture News : नंदूरबार (Nandurbar) जिल्ह्यात यावर्षीही अज्ञातांकडून पिके कापून फेकल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अज्ञातांकडून शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान होत असल्यानं शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. जिल्ह्यातील तळोदा (Taloda) तालुक्यातील बोरद इथे एका शेतकऱ्याच्या पपई बागेतील (papaya orchard) 30 ते 50 झाडांची अज्ञात माथेफिरुने कत्तल केल्याची घटना घडली आहे. यामुळं शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं आहे. या घटनेमुळं शेतकऱ्यांमध्ये भितीचं वातावरण पसरलं आहे.


तळोदा तालुक्यातील बोरद शिवारात गणेश पाटील या शेतकऱ्याने आपल्या शेतात पपईची लागवड केली आहे. मात्र अज्ञात माथेफिरुने त्यांच्या बागेतील 30 ते 50 पपईच्या झाडांची कत्तल केली आहे. पपईची झाडे कापून फेकल्याने त्याचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालं आहे. याप्रकरणी पोलीस प्रशासनानं दखल घेऊन ग्रामीण भागात गस्त वाढवावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. नंदूरबार जिल्ह्यात वारंवार अशा घटना घडत असल्यानं कठोर कारवाईची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.




नुकसान करणाऱ्या माथेफिरुवर त्वरीत कारवाई करण्याची मागणी


दरम्यान, 50 पपईच्या झाडांची कत्तल केल्यामुळं शेतकऱ्याचे मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. अचानक अशी घटना घडल्यामुळं शेतकऱ्यांमध्ये भितीचं वातावरण पसरलं आहे. तसेच याबाबत शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेचा तपास करुन नुकसान करणाऱ्या माथेफिरुवर त्वरीत कारवाई करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. त्यामुळं आता पोलीस प्रशासन कशा प्रकारे या घटनेचा तपास करणार आणि आरोपीला शोधून काढणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.




शेतीचा उत्पादन खर्च वाढला असताना विविध संकटांचा सामना


राज्यातील शेतकरी आधीच विविध संकटांचा सामना करत आहे. कधी आस्मानी तर कधी सुलतानी संकटाला तोडं देत आहेत. कधी अतिवृष्टी होते, तर कधी कमी पावसामुळं पिकं वाया जातात. याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसतो. दुसरीकडे सरकारी धोरणांचा देखील शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. कधी आयात निर्यात धोरणात बदल, तर कधी निर्यातीवर निर्बंध याचा शेतकऱ्यांना तोटा होत आहे. तसेच दुसरीकडं खतांच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. तसेच शेतीची अवजारे देखील महागली आहेत. शेतीचा उत्पादन खर्च देखील मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अशातच काही ठिकाणी अतिवृष्टी झाल्यानं शेतकऱ्यांच्या पिकांना देखील मोठा फटका बसला आहे.  


महत्त्वाच्या बातम्या: